CM Pramod Sawant: म्हादई अभयारण्य, मोर्ले, सत्तरीतील आगींच्या घटनांबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलावली बैठक

दोषी सापडले नाहीत तर वन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant: मोर्ले, सत्तरी येथील जंगलात सातत्याने लागत असलेल्या आगींबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. आज, मंगळवारी रात्री 10 वाजता ही बैठक होणार आहे. मोर्ले-सत्तरी येथील कम्युनिटी हॉलमध्ये ही बैठक होणार आहे.

CM Pramod Sawant
Goa Temperature: गोवा तापणार! 10 मार्चपर्यंत कमाल तापमानात 4 ते 5 अंशांची वाढ होण्याची शक्यता

या बैठकीत या जंगल परिसरातील आग, वणव्यांवर नियंत्रण आणि उपाययोजनांची चर्चा होऊन ठोस कार्यक्रम ठरू शकतो. या बैठकीला राज्याचे वन मंत्री विश्वजीत राणे, राज्य आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी, वन अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, या आगीच्या घटनांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. दोषी सापडले नाहीत तर वन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती सुत्रांकडून कळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pramod Sawant Convoy Accident
home minister amit shah reviews goa st reservation file
cm pramod sawant
Sattari River ,goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com