Selaulim Dam Goa: साळावली धरणाची उंची वाढवणार; जलस्त्रोत मंत्र्यांची माहिती

राज्यात आणखी 4 ते 5 लहान धरणे बांधण्याचा विचार
Selaulim Dam Goa
Selaulim Dam GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Selaulim Dam Goa: दक्षिण गोव्याची जीवनरेखा मानले जात असलेल्या साळावली धरणाची उंची वाढवण्याची सरकारची योजना आहे, अशी माहिती राज्याचे जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली. तसेच भविष्यातील 20 ते 30 वर्षांत राज्याची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी आणखी 4 ते 5 लहान धरणे बांधण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Selaulim Dam Goa
Goa Corona Update: सावधान! गोव्यात वाढतेय कोरोनारूग्णांची संख्या; 'इतक्या' नवीन रूग्णांची भर

शिरोडकर म्हणाले, म्हादई, चापोरा आणि झुआरी नदीतील जलस्रोतांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. WRD ने प्रस्तावित केलेल्या नवीन उपाययोजनांमुळे पुढील तीन दशके गोवावासीयांना पाण्याची टंचाई भासणार नाही.

आमच्या WRD अभियंत्यांनी गेल्या सहा महिन्यांत जलस्रोतांचे संवर्धन कसे करावे आणि लोकांना पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी पाणी कसे मिळेल याचा अभ्यास केला आहे. या अभ्यासातून साळावली धरणाची उंची वाढवण्याची सूचना करण्यात आली आहे.

ते पुढे म्हणाले, “गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये WRD द्वारे सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले तेव्हा साळावली धरणातील पाणी दोन मीटरने खाली गेले. ज्यामध्ये पिण्यासाठी लाखो लिटर पाणी सिंचनासाठी वापरले गेले.

WRD ने पिण्याच्या पाण्याच्या आणि सिंचनाच्या मागण्यांमध्ये समतोल साधण्यासाठी साळावली धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाळपई, धारबांदोडा, डिचोली आणि शिरोडा येथे नवीन छोटी धरणे प्रस्तावित आहेत.

Selaulim Dam Goa
Goa Crime: गोवा बनावटीची 158 लीटर दारू अनमोड तपास नाक्यावर जप्त

पुढील दोन वर्षात, WRD कडून 4 ते 5 नवीन लहान धरणे बांधणार आहे, ज्यात काजुमोल-धारबांदोडा आणि माझ्या गावात एक धरण आहे. जर सर्व काही ठीक झाले तर, काजुमोल-धारबांदोडा धरणाची पायाभरणी डिसेंबर 2023 मध्ये केली जाईल आणि धरण दोन वर्षांत तयार होईल.

WRD ने वाळपई-सत्तरी येथील धरण प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे, जो वन मंजुरीमुळे सोडला गेला होता. साल, डिचोली येथे 200 कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित आहे, जो संपूर्ण पेडणे तालुक्याच्या पाण्याची गरज भागवेल. धरणामुळे तालुक्याला अतिरिक्त 200-300 MLD पाणी उपलब्ध होईल.

शिरोडकर म्हणाले की, लहान जलकुंभ, नाले, झरे इत्यादींचा विकास केला जाईल. आम्ही गोव्यात 150 पाणवठे, प्रत्येक जिल्ह्यात 75 जलकुंभांसाठी केंद्राची योजना राबविण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. अनेक जलस्रोत आधीच ओळखून या जलकुंभांवर काम सुरू झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com