CM Pramod Sawant: मुख्यमंत्री आज दक्षिण गोव्यात

CM Pramod Sawant: ‘विकसित भारत’ अभियानांतर्गत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा बुधवारी, 13 रोजी दक्षिण गोव्यात दौरा आयोजित करण्यात आला आहे.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant:

‘विकसित भारत’ अभियानांतर्गत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा बुधवारी, 13 रोजी दक्षिण गोव्यात दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत फोंडा धारबांदोडा तसेच सांगे, कुडतरी व मडगाव आदी ठिकाणी व्यापारी व नवमतदारांशी संपर्क साधणार आहेत.

सकाळी सव्वा नऊ वाजता मुख्यमंत्री फोंड्यातील विठोबा मंदिरात देवदर्शनासाठी येणार आहेत. त्यानंतर साडे नऊ वाजता फर्मागुढी येथील पीईएसच्या फार्मसी महाविद्यालयातील नवमतदार विद्यार्थ्याशी संपर्क साधणार आहेत. त्यानंतर साडेदहा वाजता फोंड्यातील रुक्मिणी सभागृहात व्यापारी व विक्रेत्यांशी संवाद साधतील.

CM Pramod Sawant
Goa Government: सुदृढ, कुशल गोव्यासाठी सरकार कटिबद्ध; मुख्यमंत्री सावंत

दुपारी 12 वाजता कळसई - धारबांदोडा येथील लाभार्थी संमेलनाला मुख्यमंत्री उपस्थिती लावतील. दुपारी साडेतीन वाजता कुडचडे येथील व्यापारी संमेलनात ते उपस्थिताशी चर्चा करणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता सांगे पालिका सभागृहात क्रीडापटूंशी चर्चा त्यानंतर 6 वाजता कुडतरी येथे गौरव सोहळा व रात्री 8 वाजता मडगाव नानूटेल मध्ये व्यापारी व उद्योजकांशी मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pramod Sawant Economic Discipline
Goa CM Pramod Sawant accident help
Goa ST Political Reservation
Double Engine Government Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com