पणजी : राज्यात पार पडलेल्या निवडणूका आणि त्यानंतर लागलेल्या निकालाने राज्यातील अनेक मात्तबरांचे मनसुबे समोर आनले. यात आम्हीच सत्ता आणू म्हणणाऱ्या काँग्रेसला जनतेने नाकारलं. तर राज्यात पहिल्यांदाच आप आणि आरजीने आपली माणसं निवडूण आणतं सगळ्यांनाच आचबीत केलं. तर भाजपला बहुमत मिळालं. मात्र सुमारे पाच दिवसांचा अवधी ओलांडून गेल्या नंतर ही सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला नेता मिळेना... अशाच स्थितीला सामोरं जावं लागत आहे. (Chief Minister Dr. Pramod Sawant going again in Delhi for CM post)
अजूनही भाजपमध्ये पक्षांतर्गत मतभेद, अनेक जणांची दावेदारी, होळी अशा विविध कारणांमुळे विधिमंडळ नेता निवडीत अनेक अडचणी येताना दिसत आहेत. सध्यातरी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदासाठी काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) प्रबळ दावेदार असून आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू ठेवल्या आहेत. त्यामुळे राज्य व केंद्रीय भाजपसमोर पेच निर्माण झाला आहे. तर कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ टाकायची याच विवंचनेत केंद्रिय नेतृत्व आहे. यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. सावंत आज दिल्लीला रवाना झाले आहेत.
आज रात्री उशिरा काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. सावंत (Dr. Pramod Sawant) हे गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah), पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा (Party President J.P. Nadda), केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत. मात्र केंद्रीय संसदीय समितीने नेमलेले नरेंद्र सिंह तोमर आणि एल मुरुगन हे विशेष निरीक्षक आज रात्री गोव्यात (Goa) दाखल होत आहेत. ते ही उद्या भाजपच्या (BJP) आमदारांबरोबर वन टू वन चर्चा करून विधिमंडळ गटनेते पदावर शिक्कामोर्तब करणार आहेत. यावेळीच ते कोअर कमिटी बरोबर देखील चर्चा करणार आहेत.
नवी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे
सातव्या विधानसभेचा कार्यकाळ १६ मार्च रोजी म्हणजे संपत आहे. त्यामुळे नवी विधानसभा (assembly) अस्तित्वात येणे गरजेचे होते. यासाठीच राज्यपाल (Governor) पी. एस. श्रीधरन पिल्लई (P. S. Sreedharan Pillai) यांनी आपल्या विशेष अधिकाराचा वापर करत विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले होते. यासाठी त्यांनी सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांना हंगामी सभापती म्हणून नेमले होते. सभापती गावकर यांनी आज विधानसभेतील सर्व ३९ ही सदस्यांना आमदारकीच्या पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
मुख्यमंत्र्यांसह १४ जणांची कोकणीतून शपथ
आजच्या विधानसभेच्या (Legislative Assembly) विशेष अधिवेशनात (Convention) हा शपथविधी सोहळा झाला. यात काळजीवाहू मुख्यमंत्री (CM) डॉ.प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांच्यासह १४ जणांनी कोकणीतून शपथ घेतली. तर ८ जणांनी मराठीतून आणि उर्वरित आमदारांनी इंग्रजीतून शपथ घेतली. सभागृहासमोर इतर कोणतेही कामकाज नव्हते. आज आमदारांना (MLA) आमदारकीची शपथ मिळाल्यामुळे त्यांचे पद संविधानात्मक बनले असून आजपासून त्यांना सोयीसुविधा आणि इतर अधिकार प्राप्त होणार आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.