अलर्ट! आधार-पॅन लिंक करण्यासाठी ३१ मार्चची डेडलाइन

आधार-पॅन लिंक न केल्यास टॅक्स जास्त कापला जाणार
Aadhaar-PAN
Aadhaar-PANdainik gomantak
Published on
Updated on

Aadhaar-pan link : याच्या आधी अनेक वेळ शासनाने आधार-पॅन लिंक करण्यासाठी मुदत वाढ दिली होती. तर शवटची तारीख म्हणून 31 मार्च घोषीत केली होती. पण आता शासनाने दिलेली तारीख संपण्यात काहीच अवधी राहीला असून ज्यांनी आधार-पॅन लिंक केला नसेल त्यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. आधार-पॅन लिंक केला नसल्यास टॅक्स जास्त कापला जाणारच आहे. त्याचबरोबर बँकिंगशी (Banking) संबंधीत, डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या पेमेंटमध्ये समस्या ही येऊ शकते. तर ऑनलाइन (Online) व्यवहारात (Transactions) ही अडचणी येऊ शकतात. एटीएममधून पैसे ही काढतानाही त्रास दायक ठरू शकत. कारण 31 मार्च ही मुदत पुन्हा वाढवली जाणार नाही. (March 31 deadline for linking Aadhaar-PAN)

आयकर कायद्यातील 139AA तरतुदीनुसार ज्या लोकांनी 1 जुलै 2017 पर्यंत पॅन बनवले आहे आणि ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, त्यांनी आपला आधार-पॅन लिंक करायचा आहे. गेल्या तीन वर्षांत सीबीडीटीने (Central Board of Direct Taxes (CBDT)) आधार आणि पॅन लिंक करण्याची तारीख अनेक वेळा वाढवली. मात्र अनेक जनांनी पुन्हा तारीख वाढते म्हणत पॅन आणि आधार (Aadhar) लिंक केलेले नाही. मात्र आयकर कायद्यातील 139AA तरतुदीनुसार जर निर्धारित तारखेपर्यंत आधार-पॅन लिंक न केल्यास पॅन निरुपयोगी होईल. त्यामुळे आर्थिक कामात पॅनची कोणतीही भूमिका राहणार नाही. तर जे नवीन पॅनसाठी (PAN) घेणार आहेत त्यांना आधार कार्ड देणे गरजेचे आहे.

Aadhaar-PAN
पंजाबमधील नागरिकांना दिलासा; कोरोनाचे निर्बंध तात्काळ हटविण्याचे आदेश

PAN आधारशी लिंक नसेल तर...

जर PAN आधारशी लिंक नसेल, तर पॅन निरुपयोगी होईल. तर IT रिटर्न भरताना करदात्यांना त्यांचे पॅन कार्ड तपशील द्यावे लागतील. जर करदात्याने दिलेला पॅन अवैध झाला तर आयकर भरताना जादाची रक्कम भरावी लागेल. जी आयकर (Income tax) कलम २०६एए नुसार सर्वाधिक २० टक्के दराने असेल. त्यामुळे मुदत ठेवी (FD), लाभांश आणि इतर उत्पन्नावरील व्याजावर याचा परिणाम होईल.

डिफॉल्टरवर 10,000 रुपयांचा दंड

आयकर कायद्याच्या कलम 272B नुसार, एखादी व्यक्ती प्रत्येक वेळी पॅन कार्ड (PAN Card) तपशील देण्यास अपयशी ठरल्यास त्याला डिफॉल्टरवर 10,000 रुपयांचा दंड होऊ शकतो. हा दंड इतर शुल्कांव्यतिरिक्त असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com