Bhushan Ramkrishna Gavai
Bhushan Ramkrishna Gavai Dainik Gomantak

Bhushan Gavai: 'गोव्‍यातील तरुण वकिलांमध्‍ये प्रचंड बुद्धिमत्ता', सरन्‍यायाधीश गवईंचे गौरवोद्गार; साळगावकरांचे योगदान केले अधोरेखित

Chief Justice Bhushan Gavai Goa: काही निवाड्यांवरून टीकाही झाली. पण, त्‍यामुळे कधीही निराश झालो नाही. कायद्यानुसार निवाडे देऊन आपण संविधानाचे रक्षण करीत आहे, असेही सरन्‍यायाधीश भूषण गवई यांनी सांगितले.
Published on

पणजी: गोव्‍यात असताना आपण खाणींसह पर्यावरण, गुन्‍हे अशी विविध प्रकारची प्रकरणे हाताळली. प्रलंबित खटले सोडवण्‍याचा प्रयत्‍न केला. न्‍यायाधीश, सरन्‍यायाधीश या नात्‍याने आपण आत्तापर्यंत कायद्याला धरूनच निर्णय दिलेले आहेत. काही निवाड्यांवरून आपल्‍यावर टीकाही झाली. पण, त्‍यामुळे कधीही निराश झालो नाही. कायद्यानुसार निवाडे देऊन आपण संविधानाचे रक्षण करीत आहे, असेही सरन्‍यायाधीश भूषण गवई यांनी सांगितले.

गोवा उच्च न्‍यायालय बार असोसिएशनतर्फे शनिवारी दोनापावला येथे आयोजित सत्‍काराला उत्तर देताना ते बोलत होते. गोवा बार असोसिएशनचे पदाधिकारी यावेळी उपस्‍थित होते. नागपूर, औरंगाबाद, मुंबई येथे काम करून २०१३ मध्‍ये आपण गोव्‍यात दाखल झालो. या काळात सुट्टीच्‍या दिवशी आपण गोव्‍याच्‍या निसर्गसौंदर्याचा आस्‍वाद घेतला.

खोतिगाव, बोंडला अभयारण्‍याला वारंवार भेटी देत राहिलो. जॉगर्स पार्क, मिरामार किनारा आपल्‍याला मनापासून आवडत होता. गोव्‍यात आपण अनेक ज्‍येष्‍ठ वकिलांसोबत काम केले. त्‍यांच्‍या घरच्या आदरातिथ्‍याची आजही आपल्‍याला आठवण होते, असे ते म्‍हणाले. गोव्‍यातील तरुण वकिलांमध्‍ये प्रचंड बुद्धिमत्ता आहे उच्च न्‍यायालयाची नवी इमारत बघून आपल्‍याला मनापासून आनंद झाला, असेही त्‍यांनी नमूद केले.

व्ही.एम. साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गवई''बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक अराधे, न्यायमूर्ती महेश सोनक, गोवा खंडपीठाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे, उद्योजक दत्तराज साळगावकर, प्राचार्य शाबिर अली आदी उपस्थित होते. यावेळी न्यायमूर्ती महेश सोनक, न्या. वाल्मिकी मिनेझिस, न्या. अश्‍विन भोबे, माजी न्यायमूर्ती फिलिमिनो रीईस, न्या. उत्कर्ष बाक्रे यांचा गौरव करण्यात आला.

दरम्यान, सरन्यायाधीश गवई म्हणाले, या महाविद्यालयाने अनेक न्यायमूर्ती, वकील घडविले आहेत. पहिल्यांदा ज्यावेळी वकिली सुरू केली जाते, त्यावेळी अनेक ज्येष्ठ वकील अतिशय तुरळक मानधन वकिलांना देतात. त्यात त्यांना आपले जीवन व्यतीत करणे कठीण होते; परंतु अशा नव्या वकिलांना येथे महाविद्यालयात साधन-सुविधा पुरविल्या जातात. त्यांना इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून जागा दिली जाते, वाचनालय व इतर मदत केली जाते. या उपक्रमाचे देशातील इतर कायदा महाविद्यालयांनी अनुकरण करणे गरजेचे आहे.

‘जीएएफ’ने मानले आभार

गोवा ॲनिमल फेडरेशनने (जीएएफ) गोवा दौऱ्यावर आलेल्या सरन्यायाधीश भूषण गवई यांची भेट घेऊन त्याचे आभार मानले. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच प्राणी व श्वानांबाबत मानवीय, व्यावहारिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या जो आदेश काढला आहे, त्याबद्दल ‘जीएएफ’चे उपाध्यक्ष प्रकाश कामत यांनी न्या. गवई यांचे आभार मानले. सर्वोच्च न्यायालयाने सर्व स्तरातील चिंता आणि समस्या विचारात घेऊन सर्वोत्तम तोडगा काढला असल्याचे गवई यांनी सांगितले.

Bhushan Ramkrishna Gavai
South Goa Lawyers Association: दलालगिरी बंद करून म्युटेशन प्रक्रिया पारदर्शक करा; वकील संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

‘आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट’ ऑक्टोबरमध्ये

गोव्यामध्ये ९ ते १२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान होणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा २०२५’मध्ये सहभागी होण्यासाठी राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय आणि गोवा राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग यांच्या वतीने भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना शनिवारी निमंत्रण देण्यात आले. याप्रसंगी राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, राज्य दिव्यांगजन विभागाच्या संचालिका वर्षा नाईक, राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाचे सचिव ताहा हाजिक यांनी औपचारिकपणे या महोत्सवाचे माहितीपत्रक न्यायमूर्ती गवई यांना सुपुर्द केले.

Bhushan Ramkrishna Gavai
Anti-Conversion Law: ‘गोव्यात धर्मांतरण विरोधी कायदा करण्याची गरज’; मुख्यमंत्री सावंतांनी मागितले काँग्रेसचे सहकार्य

‘साळगावकर’चे वकील हुशार!

मी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहे. येथे सध्या जे वकील कार्यरत आहेत ते अतिशय हुशार आहेत आणि यामधील बहुतांशी वकिलांनी साळगावकर कायदा महाविद्यालयातून शिक्षण घेतले आहे.

कायदा ही केवळ शिकण्याची गोष्ट नसून समाजात मूलभूत बदल घडविण्याचे महत्त्वाचे साधन आहे. वकिली पेशा हा अतिशय चांगला पेशा आहे. आपण न्याय मिळवून देण्यासाठी लढत असतो. दररोज नवीन शिकायला मिळते.

शिस्त, सहनशीलता आणि जीवन जगण्याची कला आपल्याला वकिली पेशा शिकवतो. त्यामुळे सध्या देशभरात मोठ्या प्रमाणात तरुणाई वकिली पेशाकडे वळत असल्याचे समाधान वाटते. कायद्याचे रक्षण करणे, कायद्याच्या चौकटीत राहून काम करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com