Chicken Rate : चिकन पोहचले 280 रुपये किलोंवर!

पावसामुळे दर वाढले : मासे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर; अंडी 85 रुपये डझन
Cholesterol Control
Cholesterol ControlDainik Gomantak

Panaji : राज्यात मासेमारी बंदी असल्याने बाजारात कमी प्रमाणात मासळी मिळत असून ती सर्वसामान्यांना परवडणारी नाही. त्यामुळे लोक अंडी आणि चिकन खरेदीकडे वळत आहेत, परंतु मौसमी पाऊस जोरात सुरू झाल्यावर अंडी आणि चिकनचेही दर वाढले आहेत. काही दिवसांपासून 75 रुपये डझन असलेल्या अंड्यांचा दर आता 85 रुपयांवर पोहचला आहे. चिकन 280 प्रती किलो दराप्रमाणे विकले जात आहे. त्यामुळे मांसाहारही सामान्यांच्या खिशाला कात्री लावत आहे.

पणजीतील एका विक्रेत्याने सांगितले की, पोल्ट्रीच्या एका अंड्याचा दर 7 ते 8 रुपयांच्या आसपास आहे. घाऊक बाजारात 85 रुपये डझन दराने अंडी विकली जात आहेत. चिकनचा दर प्रतिकिलो 280 रुपयांवर पोचला आहे. अंडी, चिकनच्या सेवनामुळे आपल्याला प्रोटीन्स मिळतात. त्यातून आपली रोग प्रतिकारशक्ती वाढू शकते, असे सांगितले जाते. पावसाळा सुरू होताच आरोग्याच्या विविध समस्या सुरू होतात. त्यामुळे चिकन व अंड्याचे सेवन या काळात वाढते.

Cholesterol Control
Panaji Traffic : पणजीत मांडवी पुलावर ‘ओव्हरटेक’चा थरार!

बांगडे 300 रुपये किलो

राज्यात मासेमारीवर बंदी असल्याने पारंपरिक पद्धतीने मासेमारी सुरू आहे. त्यामुळे गोव्यात प्रामुख्याने बाहेरील राज्यांतील मासळी मोठ्या प्रमाणात आयात केली जाते, परंतु पारंपरिक पद्धतीने मासेमारी केलेल्या स्थानिक मासळी खरेदीकडे नागरिकांचा अधिक कल असतो. स्थानिक मासळी मोठ्या प्रमाणात महाग असते. मागाचे बांगडे 300 रुपये प्रतिकिलो दराने आज पणजी मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होते. कोळंबी, इसवण, खुबे, पापलेट, तसेच इतर विविध प्रकारची मासळी बाजारात उपलब्ध होती, पण दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com