
सांगे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन मतभेद झाल्यानंतर अखेर सांगेत चर्चसमोर पुतळा उभारण्यात आला आहे. तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (१७ मार्च) पालिकेच्या नेहरु पार्कमध्ये विधिवत महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. आमदार तथा समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते हा पुतळा उभारण्यात आला.
सांगे नगरपालिकेच्या वतीने शहरातील पालिकेच्या नेहरु पार्कमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा याबाबत ठराव समंत झाला होता. दरम्यान, याला काही नगरसेवकांनी विरोध दर्शवला होता. चर्चसमोर शिवरायांचा पुतळा उभारल्याने धार्मिक वाद होईल, त्यामुळे पुतळ्याची जागा बदलली जावी, अशी मागणी केली जात होती. पण, वाद मिटल्याचा दावा करत सांगे पालिकेच्यावतीने सोमवारी शिवरायांच्या पुतळा उभारण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आज (१७ मार्च) सर्वत्र साजरी होत आहे. यानिमित्त ढोल ताशांच्या गजरात पार्कमध्ये पुतळ्याची उभारणी करण्यात आली. यावेळी मंत्री फळदेसाई यांच्यासह नगपालिकेचे नेत्यांसह हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन नागरिकांनी हजेरी लावत सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवले. पुतळा उभारण्याबाबत असलेल्या वादावर तोडगा निघाल्याचा दावा मंत्री फळदेसाई यांनी केला आहे.
शिवरायांच्या पुतळ्याची विधिवत पूजाअर्चा, आरती झाल्यावर ढोलताशांच्या गजरात आणि शेकडो शिवप्रेमींच्या उपस्थितीत पालिका क्षेत्रात शिवगर्जना करत दुचाकी, चारचाकी वाहनांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्याला शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली होती.
पुतळा उभारण्याला झाला होता विरोध
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शहरातील पालिकेच्या नेहरु पार्कमध्ये उभारला जाऊ नये, अशी मागणी काही नगरसेवक करत होते. चर्चसमोर पुतळा उभारल्याने धार्मिक वाद होऊ शकतो, त्यामुळे पुतळ्याची जागा बदलण्याची मागणी केली जात होती. दरम्यान, याबाबत तोडगा निघाल्याचा दावा करत नियोजित जागेवरच शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.