Divjotsav: गोव्याच्या पारंपारिक 'दिवजोत्सवात' परराज्यातील दिवे! कुंभार व्यवसायास उतरती कळा

Divjotsav Canacona: लोकोत्सवातून पारंपारिक व्यवसायाना लोकाभिमुख करण्याबरोबरच त्यांना उर्जीतावस्थेत आणण्याचा एक पारंपारिक प्रयत्न आपोआपच होतो.
Divjotsav in Goa
DivjotsavDainik Gomantak
Published on
Updated on

सुभाष महाले

काणकोण: तालुक्यात खोला येथील श्री वेताळ देवालय, श्री कपिलेश्वर व श्री शिरोटी, खोला येथील श्री लक्ष्मीनारायण, चाररस्ता, किंदळे-खालवडे  येतीळ श्री निराकार देवालय त्याचप्रमाणे श्रीस्थळ, गावडोंगरी, खोतीगाव येथील श्री मल्लिकार्जुन देवालयात दिवजोत्सव होत असतो. तसेच पैंगीण येथील श्री परशुराम देवालय, तामने येथील श्री गुरु निराकार, कुळटी येथील गुरु प्रदेशी व अन्य देवालयातून दिवजोत्सव होतो. या सर्व दिवजोत्सवांसाठी लागणारी दिवजे परराज्यातून येतात.

लोकोत्सवातून पारंपारिक व्यवसायाना लोकाभिमुख करण्याबरोबरच त्यांना उर्जीतावस्थेत आणण्याचा एक पारंपारिक प्रयत्न आपोआपच होतो. मातीकामात एकेकाळी काणकोणमधील कुंभार आघाडीवर होते. तेथील काही वाडे कुंभार वाडे म्हणूनही ओळखले जातात मात्र काळाच्या ओघात कुंभार व्यवसायास काणकोणात आज उतरती कळा लागली आहे.

काणकोण तालुक्यातील मल्लिकार्जुन देवालयात व अन्य अशा तीन देवालयात दिवजोत्सव साजरा होतो. त्यावेळी हजारो दिवजांना मागणी आलेली असते. त्याशिवाय पैगीण येथील श्री वेताळ देवालय व अन्य देवालयात होणार्‍या जत्रोत्सवाच्या काळात मातीच्या मडक्याची गरज भासते. आज ही गरज काणकोण तालुक्याला जवळ असलेल्या कारवार जिल्ह्यातील माजाळी गावांतील कुंभार भागवत आहेत.

Divjotsav in Goa
Divjotsav In Goa: तोच सण, तोच उत्साह पण पद्धती होताहेत आधुनिक! दिवजोत्सवात पितळी दिव्यांचा वाढता शिरकाव

अशाप्रकारे गोव्याचे सांस्कृतिक चिन्ह असलेले ‘दिवज, गेली अनेक वर्षे कारवार व अन्य भागातून काणकोणात विक्रीस येत आहे.

स्थानिक हस्तकारागिराना प्रोत्साहन देण्यास योजना आखण्यासाठी समित्या नेमण्यात आल्या होत्या. त्या समित्यांनी आपला अहवालही सरकारला सादर केला आहे मात्र त्या समित्यांच्या शिफारशीची कार्यवाही होत नसल्याची खंत दोन-तीन वर्षे  अशा समित्यावर काम केलेल्या सदस्यांनी व्यक्त करतात. काणकोणात काही कुंभार कटुंबिय आहेत मात्र कुंभार व्यवसाय करणारे तिथे अभावानेच आढळतात. हीच परिस्थिती अन्य पारंपारिक व्यवसायांची आहे.

Divjotsav in Goa
Divjotsav: दिवजांच्या प्रकाशाने उजळली मंदिरे! भजन, पालखी, गाऱ्हाणी सादर; पारंपरिक पद्धतीने दिवजोत्सव साजरा

शिवरात्रीनंतर काणकोणात जत्रोत्सवाना आरंभ होतो. गुळे ते  व लोलये तसेच खोला ते खोतीगावांतील वेगवेगळ्या देवालयात दिवजोत्सवासाठी नवीन मातीच्या दिवजांची गरज त्यासाठी लागत असते. विवाहीत महिला (व कुमारिका देखील) जत्रोत्सवात भक्तीभावाने दिवज हाती घेतात तर विवाहीत पुरूष दिपमाळ घेऊन असतात. दरवर्षी सुमारे एक हजार दिवजांची विक्री दिवजोत्सवात होत असते. सध्या दिवजाची कि़मत प्रत्येकी दोनशे ते अडीचशे रूपये आहे. मात्र एकही स्थानिक कुंभार दिवजांची निर्मीती करत नाहीत. जत्रोत्सव काळात गोव्याचे सांस्कृतीक चिन्ह असलेले दिवज कारवार जिल्ह्यातून काणकोणात विक्रीस आणावे लागते ही शोकांतिका आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com