Shivrajyabhishek Din 2023 : शिवशाहीत कोणताही भेदभाव नव्हता : आर्लेकर

कोरगाव येथे शिवराज्याभिषेक उत्साहात
Rajyabhishek Din celebration in Corgao
Rajyabhishek Din celebration in CorgaoDainik Gomantak

छत्रपती शिवरायांच्या राज्यात कुठलाही भेदभाव नव्हता, त्यांनी सर्वांना एकत्र आणले होते. त्यांचा हा आदर्श आपण ठेवला पाहिजे. आम्हीही समाजात कुठलाही भेदभाव न करता एकत्रित गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे. महाराजांचे केवळ पाच टक्के गुण जरी आम्ही आत्मसात केले, तरी आम्ही शिवरायांचे कार्य पुढे नेत आहोत, असे समजावे, असे प्रतिपादन आमदार प्रवीण आर्लेकर यांनी कोरगाव येथे शिवराज्याभिषेकदिनी केले.

Rajyabhishek Din celebration in Corgao
Goa School : शालेय साहित्याच्या दरात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ

जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर, सतीश शेटगावकर, उपसरपंच कल्पिता कलशावकर, अब्दुल नाईक, अनुराधा कोरगावकर, देविदास नागवेकर, दिवाकर जाधव, लौकिक शेटये, उमेश च्यारी, नीता नर्से सुदन बर्वे, पेडणे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, मामलेदार अनंत मळिक, कोरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच समीर भाटलेकर, शिवाजी समारोह समितीचे अध्यक्ष उल्हास देसाई, एल. बी. गावडे, कृष्णा गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर म्हणाले, शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून गोव्यासाठीही त्यांचे मोठे योगदान आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com