school material : राज्यात सोमवारपासून नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ झाले आहे. मात्र, तरीही शालेय साहित्य खरेदीची लगबग सुरूच आहे. मॉन्सून जवळ आल्याने छत्री, रेनकोट, दफ्तर, वह्या व इतर साहित्य खरेदी मोठ्या प्रमाणात होत असून सर्व साहित्याच्या दरात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे विक्रेते सांगतात.
कागदाच्या वाढलेल्या किंमती, महागलेले प्लास्टिक आणि स्टेशनरी साहित्याचा तुटवडा, यामुळे शैक्षणिक साहित्याच्या किंमती वाढल्या आहेत. वह्यांच्या दरात थेट २० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे पालकांच्या खिशाला कात्री लागत आहे.
कोरोना काळात शाळा, महाविद्यालये ऑनलाईन सुरू होती. त्यामुळे शैक्षणिक साहित्याच्या विक्रीत काही प्रमाणात घट झाली, परंतु मागील वर्षापासून शाळा पूर्ववत सुरू झाल्याने वह्या, पुस्तके, दप्तर, रेनकोट यांच्या खरेदीसाठी आता पालक स्टेशनरी दुकानात जात आहेत.
पंरतु येत्या नव्या शैक्षणिक वर्षात शैक्षणिक साहित्याचे वाढलेले पाहून महागलेले शिक्षण पालकांच्या खिशाला परवडणारे नाही. शाळांसोबच शासकीय आणि खासगी कार्यालयांमध्येही मोठ्या प्रमाणात स्टेशनरी साहित्य लागत असते.
वाढत्या मागणीला अनुसरून दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या माहागाईच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक साहित्यही महागल्याने सर्वांचेच आर्थिक गणित बिघडत आहे.
वह्यांच्या दरात मोठी वाढ
काही महिन्यांपूर्वीच शैक्षणिक साहित्य दरात वाढ झाली होती. पण आता पुन्हा एकदा साहित्य महागले असून ३५ रुपयांना मिळणार वही ४० रुपयांना झाली आहे. १०५ रुपयांना मिळणारा कंपास १४० रुपये झाला आहे. येत्या काळात अजूनही दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे शालेय साहित्य विक्रेत्यांनी सांगितले.
रेनकोट, छत्र्याही महागल्या!
जी छत्री गेल्या वर्षी ३५० रुपयांना मिळत होती त्याच छत्रीची किंमत आता ४०० रुपये झाली आहे. उत्तम दर्जाच्या छत्र्या ५०० ते ७०० रु. एक दराने विकल्या जात आहेत. रेनकोट ७०० ते १२०० व त्याहून अधिक किंमतीचे उपलब्ध आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.