प्रत्यक्ष गोदामात जाऊन रेशन धान्याची गुणवत्ता तपासावी; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश

सडलेल्या तांदळाचा बदल्यात दुसरा धान्यसाठा देण्याचेही निर्देश
CM Dr. Pramod Sawant on Employment
CM Dr. Pramod Sawant on EmploymentDainik gomantak

सडलेल्या धान्याचा पुरवठा केल्याच्या कारणावरून सध्या नागरी पुरवठा खाते नागरिकांच्या टीकेचे धनी बनले आहे. याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खात्यातील अधिकाऱ्यांना कानपिचक्या देत धान्याच्या दर्जाबाबत केवळ दुकानदारांवर विसंबून न राहता प्रत्यक्ष गोदामात जाऊन या धान्यांची गुणवत्ता तपासा, असे आदेश आज दिले.

तर कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित केले जाईल, असा इशारा नागरी पुरवठामंत्री रवी नाईक यांनी दिला आहे. तांदूळ, तूरडाळ, साखर अशा जीवनावश्यक वस्तूंची गोदामातच नासाडी केल्यावरून अगोदरच टीकेचे लक्ष्य बनलेल्या नागरी पुरवठा खात्याकडून आता शिधापत्रिका धारकांना खराब धान्य पुरवठा केला जात असल्याचे समोर आले आहे.

CM Dr. Pramod Sawant on Employment
Sanquelim-Ponda Municipal Council:नगरसेवकांची मिळाली संमती; रश्मी देसाईच ठरल्या कारभारी

यामुळे सध्या खात्यावर विरोधकांसह नागरिकांकडूनही जोरदार टीका होत आहे. याची दखल घेत सरकारने हे धान्य परत बदलून देण्याचा आदेश दिले आहेत. ‘रेशनचे धान्य प्रत्येक शिधापत्रिका धारकाला व्यवस्थितरीत्या मिळायलाच हवे. सरकारचे ते कर्तव्यच आहे.

मात्र, रेल्वेतून येणारे धान्य तपासण्याची जबाबदारी खात्याच्या निरीक्षकांवर असते. रेल्वेतून आलेले धान्य थेट खात्याच्या गोदामात जाते म्हणून निरीक्षकांनी हे धान्य तपासायला हवे. खराब धान्य सापडल्यास त्यासंबंधी वरिष्ठांशी कळवायला हवे. त्यामुळे लगेच निर्णय घेणे शक्य होते म्हणून निरीक्षकांनी काटेकोर तपासणी करायलाच हवी. अशा तपासणीत जर कुणी दोषी सापडला तर लगेच त्याला निलंबित केले जाईल’, असा इशारा नागरी पुरवठा खात्याचे मंत्री रवी नाईक यांनी दिला आहे.

CM Dr. Pramod Sawant on Employment
Gomantak Editorial : संकटे अटळ, जबाबदार कोण?

तांदूळ बदलून देण्याचे निर्देश

नागरी पुरवठा खात्याकडून स्वस्त धान्य दुकानधारकांना सडलेल्या तांदळाचा पुरवठा झाल्याने या बदल्यात दुसरा धान्यसाठा देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हा सडलेला तांदूळ साठा अन्न महामंडळाकडून आलेल्या एका मालसाठ्यामध्ये होता, हे अहवालात नमूद होते.

गोदामात स्टोअरकिपरची असला तरी या धान्याची वेळोवेळी तपासणी करण्याचे काम हे संबंधित तालुकावर निरीक्षकाचे आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com