

चावडी: काणकोण तालुक्यातील चापोली धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता १,१२२ हेक्टोमीटर असताना सध्या केवळ ४०० हेक्टोमीटर पाणी शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पावसाअभावी उकाड्याची तीव्रता वाढली असून, नागरिकांना दैनंदिन कामकाजात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. चापोली धरणातील जलसाठा दिवसेंदिवस घटत असल्याने तालुक्याच्या पाणीपुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे.
मान्सूनने अद्याप समाधानकारक हजेरी न लावल्यामुळे खोतीगाव आणि गावडोंगरी परिसरातील अनेक जलस्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे गावडोंगरी पंचायत क्षेत्रातील नाणे, इंद्रावाडा, कूडेवाडा तसेच इतर वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.
प्रत्येकाचे डोळे पावसाच्या आगमनाकडे
पाऊस आणखी लांबल्यास पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. प्रशासन आणि नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या नियमित व समाधानकारक आगमनाकडे लागले आहे. पावसावरच संपूर्ण तालुक्याची भिस्त असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.