Chapoli Dam
Chapoli DamDainik Gomantak

Chapoli Dam: 'चापोली' ओव्हरफ्लो! मनोहारी दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Goa Tourism: काणकोणची तहान भागवणारे चापोली धरण काल २० जुलैपासून पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. हे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची पावले या धरणाकडे वळू लागली आहेत.
Published on

काणकोण: काणकोणची तहान भागवणारे चापोली धरण काल २० जुलैपासून पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. हे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची पावले या धरणाकडे वळू लागली आहेत.

या धरणाची अधिकतम पाण्‍याची क्षमता ३८.७५ आरएल म्‍हणजे ११२२ हेक्टोमीटर आहे. गेल्या वर्षी २४ जुलैला हे धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले होते. मात्र यंदा मे महिन्यापासून दमदार पाऊस झाल्याने यंदा चार दिवस आधीच ते भरले आहे.

Chapoli Dam
Amthane Dam: 'नो एंट्री'चा फलक, तरीही वाहतूक सुरूच! ‘आमठाणे’ धरणावरून गाड्यांची ये-जा

अशी माहिती जलस्रोत खात्याचे स्थानिक साहाय्यक अभियंता धनंजय रायकर यांनी दिली. आत्तापर्यंत काणकोणात सरासरी ८७ इंच पाऊस पडला आहे.

Chapoli Dam
Goa Monsoon: राज्यातील बहुतांश धरणे तुडुंब; हंगामातील 85 टक्के पाऊस जुलैमध्येच!

दरम्‍यान, गावचा लघू जलसिंचन तलाव १९ जुलैला पूर्णपणे भरला आहे. या तलावाची पाणी धारण करण्याची क्षमता ६३.५७ आरएल म्हणजे १७७ हेक्‍टोमीटर आहे. सध्‍या या पाण्याचा जलसिंचन किंवा पिण्यासाठी वापर करण्यात येत नसला तरी उन्हाळ्यात पाणीटंचाई भासल्यास तळपण नदी डोह पेयजल प्रकल्पात या धरणाच्या तलावाचे पाणी सोडण्यात येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com