Panaji News : कचरा इतरत्र फेकण्याची सवय बदला : डॉ. शरद काळे

Panaji News : आपल्या सवयींमुळेच कचऱ्याची समस्या वाढतेय
Dr. Sharad Kale
Dr. Sharad KaleDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji News : पणजी, : सकाळी उठल्याबरोबर घरातील कचरा बाहेर फेकण्याची प्रत्येकाला सवय असते. सरकार हा देश बदलेल असे स्वप्न पाहत आहे, परंतु कचरा फेकण्याची पद्धती बंद होत नाही तोवर देश कसा बदलेल असा प्रश्न साळगाव कचरा प्रकल्पाचे प्रमुख सल्लागार अणु शास्त्रज्ञ डॉ. शरद काळे यांनी उपस्थित केला.

साळगाव येथे गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने आयोजित केलेल्या तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. नागरिकांनी सवय बदलली नाही तर देश बदलणार नाही असेही सांगण्यास ते विसरले नाहीत.

ते म्हणाले, एक दिवस मुंबईच्या विमानतळावर तत्कालीन मुख्यमंत्री डॉ. मनोहर पर्रीकर यांनी चर्चेसाठी बोलावले. त्यांना साळगाव येथे कचरा प्रकल्प उभारायचा होता, त्यावेळी मी विकेंद्रीकरणाचा पुरस्कर्ता होतो तर ते कचरा व्यवस्थापनाचे केंद्रीकरण करण्याच्या मागे होते. मी त्यांचा सल्ला देण्याचा प्रस्ताव नाकारला.

Dr. Sharad Kale
Goa Crime News: अनुरागच्‍या आईची पोलिसांनी घेतली जबानी : आज मृतांवर अंत्यसंस्कार

ते म्हणाले, १५ लाखांच्या गोव्यात ८० लाख पर्यटक येतात. सरकार कोणा कोणाच्या मागे कचरा व्यवस्थापन शिकवण्यासाठी फिरेल. मग मी ते काम स्वीकारले ते आजपर्यंत करत आलो आहे. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लेविनसन मार्टिन्स यांनी स्वागत केले. रोहन घाडी यांनी सूत्रसंचालन केले. उद्या या परिषदेचा समारोप होणार आहे.

सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची

पर्यावरण शिक्षण केंद्राचे संशोधक सुजितकुमार डोंगरे यांनी मानसिकतेवर बोट ठेवले. ते म्हणाले, पंचायती व पालिकांचे कर्तव्य हे कचरा व्यवस्थापन असल्याने आम्ही कर भरत असल्याने कचरा निर्माण करणे हा आमचा आम्ही हक्क समजू लागलो आहोत.

यात बदल झाला पाहिजे. कचरा व्यवस्थापन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वैयक्तीक स्वच्छते एवढीच सार्वजनिक स्वच्छताही महत्त्वाची आहे. कचरामुक्त समाज निर्मिती ही सर्वांची जबाबदारी आहे. निसर्गाचे रक्षण आम्ही करतो असे केवळ बोलून चालणार नाही तर तशी कृतीही हवी.

मानसिकतेचा प्रश्न...

कचरा व्यवस्थापन हा मानसिकतेचा प्रश्न आहे. आपण जेव्हा केळे विकत घेतो तेव्हा केळ्याची सालही विकत घेतो. सालीची विल्हेवाटीची जबाबदारी आपलीच असते. तसेच समारंभात २५ टक्के अन्न वाया जाते. प्रत्येकाने ताटातील सर्व पदार्थ संपवले तर ओल्या कचऱ्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटेल, असे काळे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com