Goa Crime News: अनुरागच्‍या आईची पोलिसांनी घेतली जबानी : आज मृतांवर अंत्यसंस्कार

Goa Crime News: चौकशीला वेग : वास्‍को जळीतकांडप्रकरणी रितसर तक्रार दाखल
Shivani and His Father
Shivani and His FatherDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime News: शिवानी राजवत आणि जयदेवी चौहान यांच्‍या मृत्‍युप्रकरणी शुभम सिंह याने बुधवारी वास्‍को पोलिस स्‍थानकात रितसर तक्रार दाखल केल्‍यानंतर चौकशीला वेग आला असून आज (गुरुवारी) पोलिसांनी शिवानीची सासू साधना सिंह राजवत आणि नवऱ्याचा मावसा रामवरण सिंह यांच्‍या जबान्‍या नोंद करून घेतल्‍या.

या प्रकरणात शुभम सिंह याने शिवानीचा पती अनुराग राजवत याच्‍या विरोधात तक्रार देताना, हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्‍यक्‍त केला.

याप्रकरणी उद्या, ८ डिसेंबर रोजी मुरगावचे उपजिल्‍हाधिकारी भगवंत करमली हे शिवानीचे पती अनुराग आणि सासू साधना सिंह यांच्‍या जबान्‍या नोंद करून घेणार आहेत. शिवानीचा भाऊ शुभम सिंह याची जबानी त्‍यांनी आज नाेंद करून घेतली.

मुरगावचे उपजिल्‍हाधिकारी भगवंत करमली यांनी आज शिवानीचा भाऊ शुभमची चार तास जबानी घेतली. मृत शिवानी आणि जयदेवी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Shivani and His Father
Goa Crime: रशियन कैद्याचा न्यायालयातून पळून जाण्याचा प्रयत्न; ड्रग्ज प्रकरणात झाली होती अटक

शुभमच्या जबानीतून होणार उलगडा

शुभम सिंह याने केलेल्‍या दाव्‍याप्रमाणे, त्‍याची आई जयदेवी यांना देवाचे निरंजन पेटविताना जपमाळ हाती घ्यायची सवय होती.

ज्‍या अर्थी घटनास्‍थळी ही जपमाळ सापडली, त्‍याअर्थी आई दूध तापवायला नव्‍हे, तर निरंजन लावण्‍यासाठी गेली असावी.

तिने निरंजन लावण्‍यासाठी माचीसची काडी पेटविली, त्‍यावेळीच घरात पसरलेल्‍या गॅसने पेट घेऊन ती ठार झाली असावी, असा संशय व्‍यक्‍त केला आहे.

अनुरागनेच मुद्दाम गॅस खुला सोडून तो बाहेर गेला असावा. आईला वाचविण्‍यासाठी शिवानी बाथरुममधून बाहेर आल्‍यानंतर तीही जळाली असावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com