17 Minutes of Terror म्हणजे काय? चांद्रयान 3 च्या सॉफ्ट लँडिंग वेळी शेवटची 17 मिनिटे निर्णायक

Chandrayaan-3 Landing: इस्रोने चांद्रयान-३ चे विक्रम लँडर अशा प्रकारे बनवले आहे की, लँडिंग करताना ते स्वतःचे निर्णय स्वतःच घेईल. त्यामुळे शेवटच्या 17 मिनिटांत लँडरवर इस्रोचे कोणतेही नियंत्रण असणार नाही.
What is 17 Minutes of Terror? The last 17 minutes are crucial during Chandrayaan 3's soft landing.
What is 17 Minutes of Terror? The last 17 minutes are crucial during Chandrayaan 3's soft landing.Dainik Gomantak
Published on
Updated on

What is 17 Minutes of Terror? The last 17 minutes are crucial during Chandrayaan 3's soft landing:

चांदोबाच्या भूमीला स्पर्श करण्याचे भारताचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. या मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.45 वाजता विक्रम लँडर सक्रिय करतील, ज्यामध्ये लँडरला चंद्रापर्यंत शेवटचा 30 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे.

जर सर्व गोष्टी व्यवस्थित पार पडल्या तर लँडर संध्याकाळी 6.04 वाजता चंद्रावर उतरेल, परंतु 5.45 ते 6.02 या शेवटच्या प्रवासातील केवळ 17 मिनिटे हा या मोहिमेतील सर्वात महत्त्वाचा आणि धोकादायक आहे.

त्या 17 मिनिटांत काय काय होणार?

इस्रोचे माजी शास्त्रज्ञ मनीष पुरोहित यांनी सांगितले की, शेवटच्या 17 मिनिटांमध्ये 11.30 मिनिटांचा रफ ब्रेकिंग टप्पा असतो, त्यानंतर एल्टीट्यूड कंट्रोल टप्पा येतो, ज्यामध्ये सुमारे 10 सेकंद छायाचित्रे घेतली जातात आणि क्रॉसची पुष्टी केली जाते.

यानंतर स्मॉल ब्रेकिंग टप्पा येतो, ज्याला होव्हरिंग फेज म्हणतात. या दरम्यान चांद्रयानमध्ये उपस्थित असलेले सेन्सर कॅमेरा रिडिंग घेतील. यानंतर, शेवटच्या टप्प्यात, सद्यस्थिती पाहून लँडिंग करायचे की नाही हे ठरवेल जाईल.

2 मीटर प्रति सेकंदाचा वेग गाठण्याचे आव्हान

इस्रोच्या म्हणण्यानुसार, विक्रम लँडर जेव्हा लँडिंगच्या पोझिशनमध्ये येईल, तेव्हा ते त्याच्या लँडिंग साइटच्या 30 किलोमीटर वर आकाशात असेल. ही लँडिंग साइट त्या ठिकाणापासून सुमारे 700 किलोमीटर अंतरावर असेल.

विक्रम लँडरला हा 700 किलोमीटरचा प्रवास 690 सेकंदात पूर्ण करायचा आहे. यासाठी त्याला शेवटच्या बिंदूसाठी त्याचा वेग 1.6 किमी/सेकंद वरून 2 मीटर प्रति सेकंद इतका कमी करावा लागेल.

या सर्व कमांड्स विक्रम लँडरच्या संगणकाद्वारे दिल्या जातील. यामध्ये थोडीशी चूक झाल्यास लँडर सॉफ्ट ऐवजी हार्ड लँडिंग होण्याची भीती आहे.

थ्रस्टर्सच्या मदतीने वेग नियंत्रण

विक्रम लँडरला चार पाय आहेत, ज्याच्या आधारे ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. या पायांना थ्रस्टर्स (एक प्रकारचे इंजिन) जोडलेले असतात, जे त्यास विरुद्ध दिशेने ढकलतात आणि त्याचा वेग कमी करतात.

सात किमी उंचीवर विक्रम लँडिंग पोझिशमध्ये येईल

थ्रस्टरच्या मदतीने विक्रमचा वेग 60 मीटर प्रति सेकंदापर्यंत खाली आणला जाईल. विक्रम आणि चंद्रामधील अंतर 7 किमी होण्यापूर्वी थ्रस्टर्सना हे काम करावे लागेल.

येथून, विक्रम लँडिंग साइटकडे थोडेसे वळण घेईल, जे त्यावेळी 32 किमी दूर असेल. हा अँगल सुद्धा विक्रमलाच चेंज करावा लागेल.

What is 17 Minutes of Terror? The last 17 minutes are crucial during Chandrayaan 3's soft landing.
Chandrayaan 3: सॉफ्ट लँडिंग म्हणजे काय? चांद्रयान 3 समोरची आव्हानं

चुकीला वाव नाही

30 किमी उंचीवरून खाली येत असताना, विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागाला समांतर प्रदक्षिणा घालेल. या दरम्यान, खाली येण्यासाठी, त्याला कमी वेळात दोन भिन्न कार्ये करावी लागतील, ज्यामध्ये चूक होण्यास वाव नाही.

एकीकडे त्याचे थ्रस्टर्स वेग कमी करतील आणि दुसरीकडे ते लँडरला योग्य लँडिंगसाठी सरळ करतील, कारण चंद्राभोवती फिरताना लँडर वाकलेला असतो. सरळ केल्यावरच त्याचे चार पाय समान रीतीने खाली राहतील आणि सॉफ्ट लँडिंग होईल.

10 किमीच्या लँडिंग झोनमध्ये, योग्य जागा शोधावी लागेल

चांद्रयान-2 च्या लँडरच्या लँडिंगच्या वेळी लँडिंग झोन फक्त 500 स्क्वेअर मीटर निवडण्यात आला होता. नंतर, जेव्हा लँडिंग अयशस्वी झाले, तेव्हा शास्त्रज्ञांना वाटले की इतका लहान लँडिंग झोन निवडणे हा चुकीचा निर्णय होता.

त्यामुळेच चांद्रयान-३ च्या विक्रम लँडरच्या लँडिंगसाठी सुमारे १० स्क्वेअर किलोमीटरची जागा निवडण्यात आली आहे. या 10 स्क्वेअर किलोमीटरच्या लँडिंग झोनमध्ये, विक्रम लँडर त्याच्या कॅमेरे आणि सेन्सर्सच्या मदतीने लँडिंगसाठी योग्य जागा निवडून स्वतःच उतरण्याचा निर्णय घेईल.

What is 17 Minutes of Terror? The last 17 minutes are crucial during Chandrayaan 3's soft landing.
Chandrayaan-3: चांद्रयान-3 ची निर्मिती ते लँडिंग पर्यंतचा प्रवास, पाहा संपूर्ण मिशनची माहिती फक्त 60 सेकंदात

रफ ब्रेकिंग आणि फाइन ब्रेकिंग

चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरचे थ्रस्टर चांद्रयान-2 पेक्षा अधिक शक्तिशाली आहेत, परंतु लँडिंगच्या वेळीच त्यांची शक्ती तपासली जाईल. या थ्रस्टर्सना लँडरचा वेग ताशी 6 हजार किलोमीटरवरून 200 किलोमीटर प्रति तास म्हणजेच 60 मीटर प्रति सेकंद इतका कमी करावा लागतो. या अवस्थेला रफ ब्रेकिंग म्हणतात.

400 मीटरची उंची 100 मीटरवर आणताना लँडरचा वेग 60 मीटर प्रति सेकंदावरून 2 मीटर प्रति सेकंद इतका कमी केला जातो. या अवस्थेला फाइन ब्रेकिंग म्हणतात. इस्रोच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की या काळात जरी वेग 3 मीटर प्रति सेकंद राहिला तरी चांद्रयान-3 सॉफ्ट लँडिंग करू शकेल. ही संपूर्ण प्रक्रिया 17 मिनिटांत पूर्ण होईल, ज्याला 'लास्ट 17 मिनिट्स ऑफ टेरर' म्हटले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com