Goa News: '..हा अपघात नाही घातपात'! बार्रेटो मृत्‍यूप्रकरणी आईकडून शंका; न्यायासाठी राष्‍ट्रपती, पंतप्रधानांकडे साकडे

Chandor: हा प्रकार अपघात नसून त्‍याचा काटा काढण्‍यासाठी केलेला असावा. त्‍याच्‍यावर कुठलाही उपचार न करता दुर्लक्ष करण्‍यात आले, असा दावा मृताच्‍या आईने केला आहे.
Goa Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: ऑगस्‍ट महिन्‍यात गिरदोळी-चांदर येथील आनाक्‍लेत बार्रेटो या युवकाचा मृत्‍यू हा अपघाती नसून ताे घातपात असल्‍याचा संशय मृताची आई थेवोदोलिंदा बार्रेटो हिने व्‍यक्‍त केला असून प्रकरणात खुनाचा गुन्‍हा नोंद करुन तपास सुरु करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

८ ऑगस्‍ट राेजी आनाक्‍लेत या युवकाचा मृत्‍यू झाला होता. माशांना ठेवणाऱ्या ‘एक्‍वेरियम’ वर पडून त्याच्या पायाला मोठी जखम झाली होती. पायातून रक्‍तस्‍त्राव झाल्‍याने त्याचा मृत्‍यू झाल्‍याचे सांगण्‍यात आले होते. मात्र हा प्रकार अपघात नसून त्‍याचा काटा काढण्‍यासाठी केलेला असावा. त्‍याच्‍यावर कुठलाही उपचार न करता दुर्लक्ष करण्‍यात आले, असा दावा मृताच्‍या आईने केला आहे.

या प्रकरणी बार्रेटो यांनी राष्‍ट्रपती, पंतप्रधान, राज्‍यपाल आणि मुख्यमंत्री कार्यालयात तक्रार सादर केली आहे. आपला मुलगा विलक्षण तणावाखाली राहायचा. घरात त्‍याचे बायकोशी चांगले संबंध नव्‍हते.

Goa Crime News
Delivery Death Case: प्रसूतीदरम्यान 41 वर्षीय महिलेचा मृत्यू, निष्काळजीपणाचा ठपका; डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हा दाखल

आपण आपल्‍या नणंदेच्‍या एका नातेवाईकाच्‍या लग्‍नाला हजर रहाण्‍यासाठी तो ७ जुलै रोजी न्‍यूयॉर्कला गेला होता. त्‍यानंतर एका महिन्‍याने त्याचा मृत्‍यू झाला. मुलाला जी जखम झाली ती जीवघेणी नव्‍हती. तरीही त्‍याचा मृत्‍यू कसा झाला, असा सवाल तिने उपस्थित केला आहे.

Goa Crime News
Priya Marathe Death: "माझी बहीण लढवय्या होती पण त्या कॅन्सरने..." प्रियाच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावनिक पोस्ट

दरम्‍यान, या संदर्भात बार्रेटो याच्‍या मृतदेहावर चिकित्‍सा करणारे न्‍यायवैद्यक विभागाचे प्रमुख डाॅ. मधु घोडकिरेकर यांच्‍याशी संपर्क साधला असता त्यांनी या युवकाला आलेला मृत्‍यू नैसर्गिक स्‍वरुपाचा नव्‍हता, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com