No Confidence Motion: सरपंचपद मिळाले, तासाभरात अविश्वास ठराव; मांद्रेनंतर चांदेल-हसापूरमध्येही पुनरावृत्ती

Goa Panchayat Politics: पंचसदस्य बाळा शेटकर, रुचीरा मळीक आणि महेश नाईक यांनी अविश्वास ठरावावर सह्या केल्या आहेत.
Goa Panchayat Politics
No Confidence MotionDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मोरजी: पेडणे तालुक्यातील ग्रामपंचायतींचे राजकारण सध्या चांगलेच तापले असून, सरपंचपदी निवड झाल्यानंतर अवघ्या तासाभरात अविश्वास ठराव आणण्याची दुसरी घटना चांदेल-हसापूर येथे घडली आहे. नाट्यमय घडामोडींनंतर रिमा मळीक यांची सरपंचपदी निवड झाली; मात्र या निवडीचा आनंद साजरा होण्यापूर्वीच तासाभरात त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला.

पंचसदस्य बाळा शेटकर, रुचीरा मळीक आणि महेश नाईक यांनी अविश्वास ठरावावर सह्या केल्या आहेत. पंचसदस्य तुळशीदास गावस हे यापूर्वीच सत्तारूढ गटापासून वेगळे राहिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीतील सत्तेचे गणित अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी मांद्रे ग्रामपंचायतीत महेश कोनाडकर यांची सरपंचपदी निवड झाल्यानंतर अवघ्या तासाभरात त्यांच्याविरोधातही अविश्वास ठराव आणण्यात आला होता. त्यापाठोपाठ २० नोव्हेंबर रोजी चांदेल-हसापूरमध्ये त्याची पुनरावृत्ती झाल्याने पेडणे तालुक्यात या घटनांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Goa Panchayat Politics
North Goa Voter List Revision: उत्तर गोव्यात मतदार यादी पुनरीक्षण सुरू; दावे-आक्षेप नोंदवण्यासाठी 11 डिसेंबरपर्यंत मुदत

या घडामोडींमध्ये पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांची भूमिका काय, याबाबतही तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. सरपंचपदाची निवड आणि त्यानंतर लगेचच विरोधकांकडून झालेली हालचाल यामुळे स्थानिक राजकारणातील संघर्ष उघड झाला आहे. अविश्वास ठराव दाखल करण्याची प्रक्रिया आणि तो प्रत्यक्षात मंजूर होणे या वेगवेगळ्या बाबी आहेत. त्यामुळे रिमा मळीक यांचे सरपंचपद टिकणार की पुन्हा सत्तांतर होणार, याकडे संपूर्ण पेडणे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

अविश्‍वासाच्या खेळाची चर्चा

मांद्रे ग्रामपंचायतीत महेश कोनाडकर यांचीही सरपंचपदी निवड झाल्यानंतर काही तासांतच त्यांच्याविरोधातही अविश्वास ठराव आणण्यात आला होता. त्यापाठोपाठ आता चांदेल-हसापूरमध्येही तशीच घटना घडल्याने पेडणे तालुक्यात अविश्‍वासाच्या खेळाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Goa Panchayat Politics
Goa Investment Fraud: गोव्यात व्यवसायातील भागीदारीचे आमिष, भोपाळच्या कंत्राटदाराला 3.47 कोटींचा गंडा; श्रीनिवास नायकसह चौघांवर गुन्हा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.