Goa Sampark Kranti Express: चंदीगड आणि गोव्याला जोडणारी 'गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस'; वेळ, अंतर, स्थानके जाणून घ्या

चंदीगड आणि गोव्याला जोडणाऱ्या 'गोवा संपर्क क्रांती' एक्सप्रेस देखील अशीच एक महत्वाची रेल्वे आहे.
Goa Sampark Kranti Express
Goa Sampark Kranti ExpressDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Sampark Kranti Express: गोव्याची कनेक्टेव्हिटी दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात असलेली दोन विमानतळं आणि नव्याने सुरू झालेली वंदे भारत ट्रेन यामुळे प्रवशांची संख्या वाढली आहे.

दरम्यान, चंदीगड आणि गोव्याला जोडणाऱ्या 'गोवा संपर्क क्रांती' एक्सप्रेस देखील अशीच एक महत्वाची रेल्वे आहे. मडगाव ते चंदीगड दरम्यान धावणारी ही एक्सप्रेस कोकण रेल्वेद्वारे चालवली जाते.

गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस 2,367 किमीचे अंतर 34 तास 45 मिनिटांत पूर्ण करते.

मडगाव आणि चंदीगड दरम्यान ट्रेन 14 स्थानकांवर थांबते. यात अंबाला कॅंट जंक्शन, पानिपत जंक्शन, नवी दिल्ली, हजरत निजामुद्दीन, कोटा जंक्शन, रतलाम जंक्शन, वडोदरा जंक्शन, सुरत, वसई रोड, पनवेल, रत्नागिरी, पेडणे, थिवी आणि करमळी रेल्वे स्टेशनवर थांबते.

Goa Sampark Kranti Express
Goa Assembly Monsoon Session 2023: मणिपूर हिंसाचारावरून गोवा अधिवेशनात गोंधळ; सात विरोधी आमदार दोन दिवसांसाठी निलंबित

ट्रेनला 22 कोच आहेत - 2 जनरेटर कार, 4 जनरल कोच, 9 स्लीपर कोच, 1 पॅंट्री कार, 4 थ्री टायर एसी कोच, 1 टू टायर एसी कोच आणि 1 फर्स्ट आणि सेकंड एसीचा संमिश्र डबे आहेत.

मडगाव-चंदीगड-मडगाव संपर्क क्रांती एक्स्प्रेस सोमवार आणि शनिवार या आठवड्यातील दोन दिवस चालते. गोव्यातील मडगाव येथून 23:40 वाजता निघणारी क्रांती एक्सप्रेस 09:50 वाजता चंदीगडला पोहोचते. तर, चंदीगड-मडगाव संपर्क क्रांती एक्स्प्रेस 02:15 वाजता सुटते आणि मडगावला 13:00 वाजता पोहोचते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com