राज्यात गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज पावसाने चांगली हजेरी लावली. आज दिवसभर राज्यात सर्व ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पावसाची बरसात झाली. गोवा वेधशाळेने राज्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज वर्तविला होता तो खरा ठरला. गेल्या 24 तासांत राज्यात एकूण 39.1 मि. मी. पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत राज्यात एकूण 2498 मि. मी. म्हणजेच 98.35 इंच पाऊस झाला आहे.
(Chance of rain in state till September 14, rainfall on threshold of hundred in goa)
पुढील दोन दिवस असाच सुरू राहिल्यास पाऊस इंचाची शंभरी गाठेल. राज्यात 14 सप्टेंबरपर्यंत काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. तसेच देशातील काही राज्यांत उद्या मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता भारतीय वेधशाळेने वर्तविली आहे.
मच्छिमारांना इशारा: दक्षिण महाराष्ट्र तसेच गोवा तटीय 75 कि. मी.च्या क्षेत्रात 40 ते 50 कि. मी. प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांनी समुद्रात प्रवेश न करण्याचा इशारा गोवा वेधशाळेतर्फे देण्यात आला आहे.
पावसाची नोंद: फोंडा 63, पणजी 60, साखळी 60, जुने गोवे 52, म्हापसा 45.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.