Goa Crime News: हैदराबाद पोलिसांनी गोव्यात येऊन ड्रग्सव्यावसायिकांची धरपकड सुरू केल्याने राज्यातील जिल्हा व अंमलीपदार्थविरोधी कक्षाचे (एएनसी) पोलिस सक्रीय झाले आहेत. काल पहाटेच्या सुमारास किनारपट्टी परिसरातील हणजूण येथील दोन तर बागा येथील एका पबवर धडक छापा टाकण्यात आला. ही कारवाईची मोहीम किनारपट्टी भागात रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या पार्ट्यांवर सुरूच राहणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा राज्य ड्रग्समुक्त करण्याची घोषणा केल्यापासून सुस्त बनलेली पोलिस यंत्रणा गेल्या काही दिवसांपासून सक्रीय झाली आहे. क्राईम ब्रँच, जिल्हा पोलिस व अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पोलिसांनी कारवाईचा धडाकाच लावला आहे. दरदिवशी राज्यात ड्रग्सप्रकरणी गुन्हा नोंद होऊ लागला आहे. बहुतेक गांजाच सापडत असून महागड्या ड्रग्सचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.
काही दिवसांपूर्वी म्हापसा बसस्थानक आवारातून अटक करण्यात आलेल्या हैदराबादच्या संशयिताला घेऊन अंमलीपदार्थविरोधी कक्षाचे पथक अधिक चौकशीसाठी गेले होते, ते काल परतले. या पथकाने केलेल्या चौकशीत काही माहिती मिळाली असून त्या अनुषंगाने हैदराबाद पोलिसांच्या मदतीने चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक नेर्लोन आल्बुकर्क यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.