Goa Eco Sensitive Zone: ‘जैव संवेदनशील’ क्षेत्रांची पाहणी आजपासून; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती, डॉ. पांडेही होणार सहभागी

CM announces survey of bio-sensitive areas with Dr. Pandey's participation: गोव्यातील जैवसंवेदनशील क्षेत्रांतील गावांची पाहणी केंद्र सरकारचे पथक उद्यापासून करणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, सत्तरी ते काणकोण पर्यंतच्या गावांना ही समिती भेट देईल.
Goa Eco Sensitive Zone
Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Eco Sensitive Zone Central Team Inspection

पणजी: गोव्यातील जैवसंवेदनशील क्षेत्रांतील गावांची पाहणी केंद्र सरकारचे पथक करणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, सत्तरी ते काणकोण पर्यंतच्या गावांना ही समिती भेट देईल. रात्री मुख्यमंत्री, पश्चिम घाट क्षेत्रातील मतदारसंघांचे आमदार आणि समितीचे सदस्य यांची दोनापावला येथे बैठक झाली.

या बैठकीनंतर मुख्यमंत्री म्हणाले, २१ गावे वगळण्याची आम्ही मागणी केली आहे. त्या गावांची पाहणी करण्यासाठी पथकाने यावे, अशी मागणी केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान मंत्रालयाकडे केली होती. केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या मसुदा अधिसूचनेत १०८ गावांचा समावेश केला आहे.

त्याला राज्य सरकारने आक्षेप घेतला आहे. त्याच्या अभ्यासासाठी नेमलेल्या डॉ. देवेंद्र पांडे समितीच्या शिफारशीनुसार सरकारने आक्षेप नोंदवला आहे. उद्याच्या दौऱ्यात डॉ. पांडे हेही सहभागी होणार आहेत.

या गावांमध्ये स्थानिक जैवविविधतेचे संरक्षण, जंगलक्षेत्रांचा विकास, वायू आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना राबवल्या जातील. सरकारची ही पाहणी प्रक्रिया गावकऱ्यांचे हित, पर्यावरणीय तोल राखणे आणि दीर्घकालीन विकास यांचे संतुलन राखण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दक्षिण गोवा

सांगे तालुका-सुर्ला, आगलोट, धारबांदोडा, सांगोड, शिगाव, कामरखण, रुम्ब्रे, दुदाळ,साळावली,कुर्डी, रिवण,कोळंब,नायकिणी, नुने, दिगाळी, साकोर्डे, मोले, करंझोळ, कुळे,सोनावली, भोमा, ओशेल, डोंगुर्ली,मावळिंगे, पाटये, उगे, तुडव, पत्रे, विल्याण, डोंगर, परते, काले, नेत्रावळी, वेर्ले, भाटी, कुंबारी, शिगणे. काणकोण तालुका- खोला, गावडोंगरी, खोतीगाव, पैंगीण, लोलये.

यावर येईल बंदी

जैव संवेदनशील भागात खाणकाम, औष्णिक विद्युत प्रकल्प आणि प्रदूषणाच्या दृष्टीने घातक श्रेणीत येणार उद्योग यांना बंदी करण्यात आली आहे. कमी प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना या भागात परवानगी देण्यात येणार आहे. बांधकाम आणि विभागाच्या विकासाचे प्रकल्प उभारण्यास मनाई करण्यात येणार आहे.

Goa Eco Sensitive Zone
Tanvi Vasta Arrest: 'तन्‍वी' प्रकरणाची व्याप्ती 'मोठी'! आणखी दोन तक्रारी दाखल; Social Media वरची पोस्ट चर्चेत

जैवसंवेदनशील भाग जिल्हा उत्तर गोवा

तालुका सत्तरी- अंजुणे, शिरोळी, गुळे, बायलावाडा, पाळी, शिंगणा, साल्पी बुद्रूक, झर्मे, नानेली, माळोली, कोपार्डे, ब्रम्हा करमळी, हेदोडे, उस्ते, आंबेडे, डोंगरवाडा, मावशी, भुईपाल, बोंबडे, वेळुस, सोनाळ, सावर्डे, कुमार खण, वाळपई, वेळगे, हसोळे, करमळी बुद्रूक, बाराजण, पणशे, शेळपी खुर्द, भिरोंडे, खोतोडे, शिरसोडे, करंझोळ, असोडे, मेळावली, गोटयांखाडीलवाडा, आंबेली, गवाणे, मलपण, सुर्ल, साट्रे, गोआवळी, चरवणे, हिवरे खुर्द, हिवरे बुद्रूक, केळावडे, रिवे, कोडाळ, डोंगुरवडा, देरोडे, वायंगणी, नानोडे, झरणी, कोडाळ, पेन्राळ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com