Goa ESI Hospital: ‘ईएसआय’ हॉस्पिटलसाठी केंद्र सरकार सकारात्मक

Mulgao News: मुळगाव येथील नियोजित ‘ईएसआय’ हॉस्पिटल प्रकल्पाला लवकरच चालना मिळण्याच्या आशा
Mulgao News: मुळगाव येथील नियोजित ‘ईएसआय’ हॉस्पिटल प्रकल्पाला लवकरच चालना मिळण्याच्या आशा
Hospital canava

डिचोली मतदारसंघातील मुळगाव येथील नियोजित ‘ईएसआय’ हॉस्पिटल प्रकल्पाला लवकरच चालना मिळण्याच्या आशा आता पल्लवीत झाल्या आहेत. या प्रकल्पाबाबतीत केंद्र सरकारही सकारात्मक आहे.

राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी शुक्रवारी (ता.२८) दिल्ली येथे केंद्रीय मजूर आणि रोजगारमंत्री डॉ. मनसुख मंडाविया यांची भेट घेऊन त्यांना हॉस्पिटलचा प्रस्ताव सादर केला. मुळगाव येथील नियोजित ‘ईएसआय’ हॉस्पिटल प्रकल्पाला चालना मिळावी, यासाठी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये प्रयत्नशील असून, अलीकडेच त्यांनी हा प्रकल्प खासदार तानावडे यांना सादर केला होता.

Mulgao News: मुळगाव येथील नियोजित ‘ईएसआय’ हॉस्पिटल प्रकल्पाला लवकरच चालना मिळण्याच्या आशा
ESI Hospital: ''ईएसआय'' हॉस्पिटल प्रकल्पाला शिघ्रगतीने चालना द्या; डॉ. शेट्ये यांची मागणी

मुळगाव येथील गृहनिर्माण मंडळाच्या जागेत १५० खाटांचा हा महत्त्वाकांक्षी ईएसआय हॉस्पिटल प्रकल्प उभा राहणार आहे. २० हजार २३५ चौरस मीटर जागेत हे हॉस्पिटल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी बहुतेक सर्व सोपस्कार जवळपास पूर्ण झाले आहेत. दरम्यान, या प्रकल्पासाठी केंद्र सरकार सकारात्मक असल्याने त्यांनी खासदार तानावडे यांच्यासह केंद्रीयमंत्री डॉ. मनसुख मंडाविया यांना धन्यवाद दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com