Goa Congress: गोवा विधानसभेत महिलांना 33% आरक्षण द्या! अलका लांबांची मागणी; काँग्रेसतर्फे घेराव आंदोलनाचे आयोजन

Women Political Reservation: देशभर विविध राज्यांत काँग्रेस पक्षातर्फे महिलांच्या राजकीय आरक्षणासाठी आंदोलन केले जाणार आहे.
Alaka Lamba, Goa Congress
Alaka Lamba, Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: केंद्र सरकारने देशभरात ३३ टक्के महिलांना राजकीय आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर केले, पण ते विधेयक लागू करण्यासाठी काँग्रेस पक्षाने संसदीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिल्लीत आंदोलन केले.

देशभर विविध राज्यांत काँग्रेस पक्षातर्फे महिलांच्या राजकीय आरक्षणासाठी आंदोलन केले जाणार आहे. त्याशिवाय गोव्यातही महिला काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री आणि विधानसभेवर घेराव आंदोलन केले जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अलका लांबा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी महिला काँग्रेसच्या नूतन प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रतीक्षा खलप यांची उपस्थिती होती. लांबा म्हणाल्या, गोव्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. भाजप सरकार अजिबात या घटनांबाबत गंभीर दिसत नाही.

Alaka Lamba, Goa Congress
Goa Budget Session 2025: तीन दिवसांचे अधिवेशन! विरोधी पक्षाच्या आमदारांना मुद्दे मांडण्याची मुभा द्या; LOP आलेमाव

हे सरकार महिलांना सुरक्षितता देण्यात अपयशी ठरली आहे, त्याचा परिणाम केवळ स्थानिक महिलांवरच नाही, तर पर्यटक म्हणून आलेल्या परदेशातील महिलांवरही झाला आहे. ‘बेटी बचाव’चा जो निधी आहे, तो जाहिरातींवर खर्च केला आहे, त्यापेक्षा युवतींच्या महिला सुरक्षिततेवर खर्च करायला हवा. याशिवाय त्यांनी विविध उदाहरणे दिली.

Alaka Lamba, Goa Congress
Goa Assembly:'हे पाप 5 वर्षे प्रयागात डुबक्या मारून धुतले जाणार नाही'; नाहक खर्च कशाला? म्हणून सरकारने टाळले असावे पूर्णवेळ अधिवेशन

‘बेटी बचाव’चा निधी जाहिरातींवर खर्च

‘बेटी बचाव’चा जो निधी आहे, तो गोवा सरकारने जाहिरातींवर खर्च केला आहे. त्यापेक्षा तो युवती आणि महिलांच्या सुरक्षिततेवर खर्च करायला हवा, असे लांबा म्हणाल्या. याशिवाय विविध उदाहरणे देऊन गोव्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रदेश महिला काँग्रेसतर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांविषयी लांबा यांनी माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com