Goa News: ...यामुळे सोनसोडोत इतरांसाठी स्मशानभूमी अशक्य

सोनसोडो येथील सुमारे अडीच हजार चौ. मी. जागा कब्रस्तानसाठी निश्चित करण्यात आली आहे.
Goa News|Cemetery
Goa News|CemeteryDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa News: सोनसोडो येथील सुमारे अडीच हजार चौ. मी. जागा कब्रस्तानसाठी चिन्हांकित करण्यात आली आहे. तेथील डोंगराळ भागातील जागा उतार असल्याने तेथे इतर समाजासाठी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करणे अशक्य आहे.

कब्रस्तान बांधकामासाठी ‘जी- सुडा’मार्फत निविदा जारी करून त्याच्या कामाची माहिती देण्यासाठी ही सुनावणी आता येत्या 3 मे 2023 रोजी ठेवण्यात आली आहे.

सरकारने कब्रस्तानसाठी सोनसोडो येथे मुस्लीम बांधवांसाठी जागा उपलब्ध केली होती, मात्र या जागेत अनेक वर्षे बांधकामच झाले नव्हते. त्यामुळे एका मुस्लीम नागरिकाने जनहित याचिका सादर करून कब्रस्तानसाठी जागा निश्‍चित करून त्याचे बांधकामाचे निर्देश देण्याची विनंती केली होती.

सोनसोडो येथे सरकारची सुमारे 33 हजार चौ. मी. जागा डोंगर भागात आहे. त्यातील सुमारे 10 हजार चौ. मी. जागा कब्रस्तानसाठी देऊ केली होती. मात्र न्यायालयाने या जागेसंदर्भात तपासणी करण्याचे निर्देश दिल्यानंतर त्यातील फक्त 2500 चौ. मी. जागाच कब्रस्तानसाठी देणे शक्य आहे.

तर उर्वरित जागा उतार असल्याने तेथे बांधकाम होऊ शकत नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने आधी कब्रस्तानचा विषय घेतल्यानंतर इतर समाजासाठी स्मशानभूमीच्या विषयावर याचिकेवरील अंतिम सुनावणीवेळी त्यावर विचार केला जाईल, असे स्पष्ट केले.

Goa News|Cemetery
Mapusa Municipality: म्हापसा नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित कारण...

कब्रस्तानसाठी जागा निश्‍चित

कब्रस्तानच्या बांधकामासाठी अडीच हजार चौ. मी. जमीन निश्‍चित करण्यात आली आहे. या कामाची निविदा गोवा राज्य शहर विकास प्राधिकरण (जी-सुडा) यांच्यामार्फत काढण्यात येणार आहे.

हे काम येत्या 30 एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या जमिनीच्या सभोवती कंपाऊंड तसेच मुस्लीम बांधवांसाठी प्रार्थना स्थळ याचे बांधकाम करायचे आहे व ते दिलेल्या मुदतीत पूर्ण होऊ शकते, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

MLA Protection Yatra
Dabolim Airport 13000 passengers daily
Goa Fodder Production Plan
Parul Gulati Goa Villa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com