पणजीत सीसीटीव्ही कॅमेरे 31 जुलैनंतर होणार कार्यरत

कायदा मोडणाऱ्यांवर नजर : नियम न पाळणाऱ्यांना दंड
CCTV In Goa
CCTV In Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : इमेजिन स्मार्ट सिटी पणजी प्रकल्पांतर्गत बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे यावर्षी 31 जुलै नंतर कार्यरत होण्याची शक्यता आहे. पणजी शहरात विविध ठिकाणी एकूण 392 कॅमेरे बसवण्यात आले असून वाहन कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठवण्यासाठी याचा वापर केला जाईल. स्मार्ट सिटी, वाहतूक खाते आणि वाहतूक पोलिस विभाग समन्वय करून कारवाई करणार असल्याचे समजते.

तीन प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यात 338 फिक्सिड बॉक्स, 44 पीटीझेड आणि 10 एफआरएस यांचा समावेश आहे. फिक्सिड बॉक्स हे न हलणारे कॅमेरा आहेत. पीटीझेड कॅमेरा हे हलणारे असून कुठल्याही दिशेने हलवता येईल, तसेच यात झूम करण्याची सुविधा आहे. एफआरएस कॅमेऱ्यामध्ये चेहरा ओळखण्याची प्रणाली आहे. तसेच कॅमेऱ्यांसोबत 10 ठिकाणी गती तपासणारे यंत्र बसवण्यात आले आहेत, अशी माहिती इमेजिन स्मार्ट सिटी पणजीचे मुख्य महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी दै. ‘गोमन्तक’ला दिली. त्यांनी पुढे सांगितले की, सध्या कॅमेरे चाचणी तत्त्वांवर सुरू आहेत. 31 जुलैपर्यंत कॅमेरे सुरू करण्याची मुदत आहे, परंतु पावसाळा सुरू होत असल्याने ही मुदत वाढू शकते.

CCTV In Goa
‘धर्माच्या नावाखाली भाजपचे राजकारण’

स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम जुलै 2018 साली सुरू झाले होते, परंतु, मध्यंतरी कोरोना महामारीमुळे काम वेळेत पूर्ण करता आले नाही. कॅमेरे आणि इतर गोष्टी मिळून एकूण 214 कोटी रुपये खर्च आला आहे. यात जीएसटी, चालवणे आणि देखरेख यांचा समावेश आहे. कॅमेरे पणजीतील आल्तिनो येथील एकात्मिक आदेश आणि नियंत्रण केंद्र येथून चालविले जाईल, असे कुमार यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com