Goa Ganesh Chaturthi 2023: सीसीटीव्ही कॅमेरे, रक्षक अनिवार्य वास्को पाेलिसांचे निर्देश

Goa Ganesh Chaturthi 2023: वास्कोत पाेलिसांचे निर्देश : चतुर्थी काळात ध्वनिप्रदूषण टाळा
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

Goa Ganesh Chaturthi 2023: प्रत्येक सार्वजनिक मंडळाने गणेशोत्सव मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे व सुरक्षा रक्षक नेमणे अनिवार्य आहे. तसेच लाऊड स्पीकर वापरण्यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संपर्क साधावा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० नंतर लाऊड स्पीकर वापरण्यास बंदी असल्याने सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक सलीम शेख यांनी केले.

Goa Police
Accident News: अपघातग्रस्‍त तरुणाला व्‍हिलचेअर प्रदान

वास्को पोलिस स्थानकात शेख यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची कायदा - सुव्यवस्थेविषयी बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत वास्कोचे पोलिस निरीक्षक कपिल नायक, मुरगावचे निरीक्षक एलविटो रॉड्रिग्स उपस्थित होते. पोलिस प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडप परिसरात गस्त घालणार आहेत. रात्री प्रत्येक मंडळाला पोलिस सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. तरीही मंडळांनी आपला खासगी सुरक्षा रक्षक नेमावा, अशी विनंती शेख यांनी केली.

पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी आभार मानले.

हे नियम पाळा!

  • श्रींच्या दर्शनासाठी मंडपाचा दरवाजा मोठा असावा, जेणेकरून गर्दी होणार नाही.

  • एखादी अनोळखी वस्तू वा संशयास्पद व्यक्ती मंडपात आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.

  • फटाके वाजविताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.

  • प्रत्येक मंडळाने आगीवर नियंत्रण राखण्यासाठी यंत्रसामग्री उपलब्ध करावी.

  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० नंतर लाऊड स्पीकरचा वापर करू नये.

  • समुद्रात गणेश विसर्जन करताना सर्व मंडळांनी सतर्कता बाळगावी.

  • विसर्जनावेळी जीवरक्षकांचे सहकार्य घ्यावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com