Cashew Fest Goa 2023 : पणजीत दोन दिवस ‘काजू फेस्त गोवा 2023’

15 आणि रविवार, 16 रोजी दयानंद बांदोडकर मैदान कांपाल-पणजी येथे आयोजन
Curtain Raiser ceremony of Cashew Fest 2023
Curtain Raiser ceremony of Cashew Fest 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

गोवा वन विकास महामंडळाने शनिवार, 15 आणि रविवार, 16 रोजी दयानंद बांदोडकर मैदान कांपाल-पणजी येथे दोन दिवसीय ‘काजू फेस्त गोवा 2023’चे आयोजन केले आहे.

शनिवार, 15 रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सभापती रमेश तवडकर, वनमंत्री विश्वजीत राणे, ईडीसीचे अध्यक्ष व भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. देश-विदेशातून काजू चाहते या महोत्सवाला हजेरी लावणार आहेत.

Curtain Raiser ceremony of Cashew Fest 2023
Tigers in Goa Declining: गोव्यात वाघांची घटणारी संख्या चिंताजनक

कृषीमंत्री रवी नाईक, सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, क्रीडा व युवा व्यवहार मंत्री गोविंद गावडे, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, जीटीडीसीचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर, जीएफडीसीच्या अध्यक्ष डॉ. दिव्या राणे, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, मुख्य सचिव डॉ. पुनीत कुमार गोयल, आयएएस, प्रधान मुख्य वनसंरक्षक राजीव कुमार गुप्ता, आयएफएस यावेळी उपस्थित राहणार आहेत.

Curtain Raiser ceremony of Cashew Fest 2023
Canacona News : काणकोण रवींद्र भवनाचे काम संथगतीने

‘फॅशन शो’चे आकर्षण

दोन दिवसीय काजू फेस्तामध्ये लाइव्ह बँड रागास टू रिचीज, शोर पोलिस, गोव्याच्या नाईटीनगेल लोर्ना स्टेबिन बेन (पार्श्वगायक आणि परफॉर्मर) आणि वर्मा डिमेलो यांचा फॅशन शो असेल.

या महोत्सवाला नागरिकांनी आवर्जून हजेरी लावत गोव्याच्या काजूसंदर्भात माहिती आणि ज्ञान संपादन करावे, असे आवाहन आयोजकांद्वारे करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com