Canacona Ravindra Bhavan
Canacona Ravindra BhavanDainik Gomantak

Canacona News : काणकोण रवींद्र भवनाचे काम संथगतीने

खात्‍याच्या संचालकांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी केली
Published on

पाच वर्षांपूर्वी काणकोणात सुरू केलेले रवींद्र भवनाचे काम संथगतीने चालले आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी कला व संस्कृती खात्याकडे आल्या होत्‍या. त्‍या पार्श्वभूमीवर खात्‍याचे संचालक सगुण वेळीप यांनी सोमवारी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली व संथगतीने काम होत असल्‍याबद्दल नाराजी व्‍यक्त केली.

Canacona Ravindra Bhavan
Colvale Crime: कोलवाळ येथे परप्रांतीय चालवत होते बेकायदा कॉल सेंटर; क्राईम ब्रँचकडून 33 जणांना अटक

यावेळी त्यांच्यासोबत खात्याच्‍या प्रितम नाईक आणि मान्‍यवरांची उपस्‍थिती होती. संचालक वेळीप यांनी कंत्राटदाराल रवींद्र भवनाच्या कामाला गती देण्याची सूचना केली. या प्रकल्पात तालुका वाचनालय सुरू करण्यात येणार आहे.

पूर्वी हे वाचनालय पालिकेच्या वास्तूत सुरू होते. मात्र पालिकेची वास्तू पालिका भवन उभारण्यासाठी मोडल्याने वाचनालयाचे स्थलांतर देवाबाग येथे कोमरपंत समाजाच्या सभागृहात करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com