Cashew Base Price : काजू आधारभूत किंमत प्रकिया सुधारणार : मुख्यमंत्री सावंत

Cashew Base Price : आयात काजूंमुळे मिळत नाही उत्‍पादकांना दर
 Cashew
Cashew Dainik Gomantak
Published on
Updated on

Cashew Base Price :

पणजी, गोवा हे एकमेव राज्य आहे जे काजू उत्पादक शेतकऱ्यांना १५० रूपये आधारभूत किंमत देते. परंतु ही आधारभूत किंमत सर्वच शेतकऱ्यांना काही तांत्रिक बाबींमुळे मिळत नाही.

त्यामुळे ही प्रक्रिया कशा प्रकारे सुरळीत करता येईल, जेणेकरून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ घेता येईल, याबाबतीत सरकार विचार करत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

दरबार हॉल राजभवन येथे कोको विकास संचालनालय कोची, कृषी संचालनालय, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शाश्‍वत काजू उत्पादन संधी आणि आव्हाने या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्‌घाटनसमयी मुख्‍यमंत्री बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, फलोत्पादन आयुक्त प्रभात कुमार, कृषी संचाल संदीप फळदेसाई व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्‍यमंत्री म्हणाले, काजू बोंडूंपासून हुर्राक, फेणी, निरो आदी बनविणारे गोवा हे एकमेव राज्य आहे. येथील फेणी, काजूंना जीआय टॅग मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकेतून गोव्यात आयात होणाऱ्या काजूंमुळे येथील शेतकऱ्यांना चांगला दर मिळत नाही. चवीच्या दृष्टिकोनातून गोव्याच्या काजूंची तुलना होऊ शकत नाही. बाहेरील काजूगर गोव्याचे सांगून विकले जातात यावर अन्न आणि औषध प्रशासन तसेच आपण विचार विनिमय करून सल्ला देणे गरजेचे आहे.

 Cashew
Goa Power Tariff Hike: गोमंतकीयांच्या खिशाला झळ बसणार, रविवारपासून वीज दरवाढीचा शॉक

मोठा मोबदला देणारे पीक

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नरत आहेत. काजू शेती ही कमी कष्टात मोठ्या प्रमाणात मोबदला देणारी आहे. त्यामुळे काजूची लागवड मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. इंटर क्रॉप प्रकियेचा अवलंब करत शेती केल्यास ती अधिक चांगली. त्यासोबतच फेणी उत्पादनाचा देखील विचार करत या परिषदेत विविध विषयांवर चर्चा केली जाईल, अशी आशा व्यक्त करत असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com