Goa Crime: अवेडे केप्यात दोन गटात तुंबळ हाणामारी; आत्मघाती हल्ल्यात तिघे जखमी

Quepem Crime News: स्थानिक गटांमध्ये झालेल्या वादात तिघे जखमी
स्थानिक गटांमध्ये झालेल्या वादात तिघे जखमी
Quepem Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Quepem, Goa

केपे: अवेडे केपे येथे आज (4 नोव्हेंबर) दोन स्थानिक गटांमध्ये किरकोळ कारणावरुन राडा झाला. काही क्षणातच गटांमधील राड्याचे स्वरुप आत्मघाती हल्ल्यात बदलले, ज्यामध्ये दोन्ही गटांमधील एकूण तिघेजण जखमी झाले आहेत. दोन्ही गटांमध्ये झालेल्या या राड्यावर एकमेकांवर कोयत्याने वार करण्यासारखा भीषण प्रकार घडला. सध्या दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण प्रकरणाची केपे पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अर्जुन सांगोडकर आणि केपे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

प्रकरण नेमकं काय?

एका गटाने दिलेल्या माहितीनुसार अवेडे केपे येथे मंदिरात पावणी सुरू होती. काल (3 ऑक्टोबर) लक्ष्मी पूजनाच्या मुहुर्तावर मंदिर कमिटीने ठरवले की, ज्यांनी गेल्या वर्षीच्या पावणीचे पैसे दिले नाहीत त्यांना यावर्षी घेणार नाहीत. आणि म्हणूनच पार्यो गावकर याला पावणीतून हटविण्यात आले मात्र हे ऐकूण पार्यो गांवकर नावाच्या व्यक्तीला राग अनावर झाला. मंदिर कमिटीने त्याला गेल्या वर्षीच्या पावणीचे पैसे मागताच त्याने मंदिरातच राडा घालण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता त्याने मंदिर कमिटीमधील सदस्य असणाऱ्या गौऱेष नावाच्या व्यक्तीच्या घरी जावून शिवीगाळ करत त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. ज्यामध्ये गौरेषला वाचवण्यासाठी आलेल्या त्याच्या मामाच्या मुलाला (अनिष) तो कोयता लागला. मात्र या हल्ल्यात अनिषसह हल्लेखोर पार्यो गावकरही जखमी झाला आणि त्याने बचाव करण्याचा प्रयत्न केला होता असे दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे.

स्थानिक गटांमध्ये झालेल्या वादात तिघे जखमी
Goa Crime: अखेर डिकॉस्टाला 'मोपा' वर अटक; पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी नऊ वर्षांपासून होता फरार

गावकरी काय सांगतात

अवेडे केपेतील गावातील गावकऱ्यांनी सांगितले की, हा व्यक्ती सतत गावातील लोकांना त्रास देतो. आगोदरही या व्यक्तीच्या विरोधात अशाच तक्रारी समोर आल्या आहेत. मात्र पोलिस या व्यक्तीच्या विरोधात तक्रारही नोंदवून घेत नाहीत. सरपंच भूपेंद्र देसाई यांनी सांगितले की, पोलिसांनी तात्काळ अशा घटनांवर आळा बसवत गावात शांततेचं वातावरण निर्माण करावं.

7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पार्यो चंद्रकांत गावकर यांच्या घरात घुसून त्यांना आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी अवेडे-केपेतील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिश गावकर, गौरीश गावकर, प्रमोद गावकर, रितेश गावकर, रामा गावकर, दामोदर गावकर आणि दिव्या गावकर अशी आरोपींची नावे असून, त्यांनी पार्यो यांना शिवीगाळ करत मारहाण केली, ज्यामध्ये ते जखमी झाले. तसेच, त्यांनी पार्यो यांच्या पत्नीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत कुटुंबाला जिवे मारण्याची धमकीही दिली. ही घटना 3 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 11:30 वाजता घडली. दरम्यान, भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत सात जाणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करतायेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com