'कासा'च्या मालकाला झटका, कळंगुटमधील 5 हॉटेलचे अतिक्रमण 30 दिवसांत हटविण्याचे आदेश

कळंगुटमधील समुहाच्या पाच हॉटेल्सनी सीआरझेड नो-डेव्हलपमेंट झोनमध्ये केलेले बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचे आदेश अथॉरिटीने दिले आहेत.
Calangute Beach
Calangute BeachDainik Gomantak
Published on
Updated on

कासा हॉटेल समूहाच्या मालकाला गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीने (GCZMA) दणका दिला आहे. कळंगुटमधील समुहाच्या पाच हॉटेल्सनी सीआरझेड नो-डेव्हलपमेंट झोनमध्ये केलेले बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचे आदेश अथॉरिटीने दिले आहेत. नोटीस बजावल्यानंतर तीस दिवसांत बांधकाम पाडण्याची सूचना करण्यात आली आहे.

यामध्ये कासा वागातोर, कासा कोलवाळ, कासा ब्रिटोना, कासा बागा आणि कासा अंजुना या हॉटेल्सचा समावेश आहे.

बेकायदेशीर बांधकामाबाबत कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यात 2016 रोजी काशिनाथ शेट्ये यांनी देखील तक्रार केली होती. बांधकामाची वैधता सिद्ध करण्यात हॉटेल मालक अपयशी ठरल्याचे अथॉरिटीने म्हटले आहे.

अथॉरिटीच्या निर्णयाला आव्हान देत हॉटेल मालकाने राष्ट्रीय हरीत लवादाकडे धाव घेतली, त्यानंतर लवादाने हा विषय पुन्हा ऐकून घेण्यास सांगितले. दरम्यान, कोस्टल अथॉरिटीने या जागेचा संपूर्ण सर्व्हे केला तसेच, बेकायदेशीर कामाचे रेखांकन केले.

त्यानंतर मालकाला बांधकाम बेकायदेशीर कशी नाहीत हे सिद्ध करण्यास सांगितले मात्र, त्यात ते अयशस्वी ठरले. तसेच, बेकायदेशीर भाग होत तो पाडल्याचेही त्याने सांगितले. मात्र, कोस्टल अथॉरिटीला रेखांकन करताना बेकायदेशीर बांधकाम आढळून आले आणि मालकाला ते पाडण्याचे आदेश दिले.

Calangute Beach
Goa Monsoon 2023: गोव्यात पुढील चार दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा

सर्व्हे क्रमांक 244/2 येथे 20 मार्च 2023 रोजी जागेचे निरीक्षण करण्यात आले. दरम्यान, मालकाला नोटीस मिळाल्यानंतर तीस दिवसांत बेकायदेशीर बांधकाम पाडावे लागणार आहे. तसेच, अतिक्रमण केलेली जागा पूर्ववत करावी लागणार आहे.

तक्रारदार शेट्ये यांनी एका सुनावणी दरम्यान या पाचही मालमत्तेची खरेदी 1991 नंतर झाल्याचे सांगितले. मालकाने रहिवाशी जागेचे रूपांतर व्यावसायिक जागेत करून त्याठिकाणी आता हॉटेल्स चालवले जात असल्याचे म्हटले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com