Goa Monsoon 2023: गोव्यात पुढील चार दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा

दोन्ही जिल्ह्यात 2 ते 5 ऑगस्ट याकाळात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.
Goa Monsoon 2023
Goa Monsoon 2023Dainik Gomantak

Goa Monsoon 2023: गोव्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. दोन दिवसांत अधूनमधून येणाऱ्या सरी वगळता मोठ्या पावसाची नोंद झालेली नाही. पण, पुढील चार दिवसांसाठी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याच्या वतीने देण्यात आला आहे.

दोन्ही जिल्ह्यात 2 ते 5 ऑगस्ट याकाळात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.

गोवा हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, ईशान्य बंगालच्या उपसागरावरील तीव्र दबावामुळे पुढील चार दिवस गोव्यातील दोन्ही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 02, 03, 04 आणि 05 ऑगस्ट रोजी राज्यात मुसळधार पावसाचा वेधशाळेने अंदाज वर्तवला आहे.

Goa Monsoon 2023
Jayesh Chodankar Case: चोडणकर खूनप्रकरणी सुनावणी 7 पर्यंत तहकूब

आजपासून राज्यात मासेमारी सुरू पण समुद्रात न जाण्याचा मच्छिमारांना इशारा

पावसाळा सुरू झाल्यानंतर एक जूनपासून राज्यात दोन महिन्यांसाठी मासेमारीवर बंदी घातली जाते. दरम्यान, 61 दिवसांची ही बंदी उठवली जात असून, आजपासून राज्यातील जनतेला ताजी मासळी खायला मिळेल.

पण, समुद्र खवळलेला असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्याच्या वतीने देण्यात आला आहे. पुढील पाच दिवसांसाठी हा इशारा देण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com