Goa Carnival 2024: स्मार्ट सिटीच्या कामाचा कार्निव्हलप्रेमींना फटका

Goa Carnival 2024: शहरात तोबा गर्दी: वाहतुकीचा बट्ट्याबोळ
Goa Carnival 2024
Goa Carnival 2024Dainik Gomantak

Goa Carnival 2024: एका बाजूला शहरात रस्त्याची सुरू असलेली कामे, त्यावरून दररोज उडणारी धूळ याचा पणजीकर दररोज त्रास सहन करीत होते. परंतु शनिवारी वाहतूक कोंडीचा केवळ पणजीकरांनाच नाहीतर पणजीतून बाहेर जाणाऱ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला.

18 जून रस्त्यावर गोवा फार्मसी कॉलेजपासून मेरी इमॅक्युलेट चर्चपर्यंत वाहन घेऊन जाण्यासाठी वाहनचालकांना सुमारे एक तासाचा अवधी लागला. हा सर्व प्रकार कार्निव्हल आयोजन समितीच्या हट्टापायी झाला अशी संतप्त प्रतिक्रिया पणजीकरांतून व्यक्त होत होती.

मागील वर्षांपासून स्मार्ट सिटीच्या कामांमुळे शहरात दररोज रस्ता खोदकाम सुरू आहे. काही रस्त्यांचे टप्प्याटप्प्याने काम झाले आहे, परंतु इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडच्यावतीने सध्या कामांना गती देण्यात आली आहे. त्यामुळे बांदोडकर मार्ग आणि आल्तिनोचे

Goa Carnival 2024
Goa Central Library: अत्याधुनिक सुविधा देणारे सर्वात जुने गोव्यातील मध्यवर्ती ग्रंथालय

मार्ग सोडले, तर सर्वत्र स्मार्ट सिटीची कामे सुरू असलेली दिसतात. त्यात दररोज धुळीचा त्रास पणजीकरांना गतवर्षीपासून सहन करावा लागत आहे. शनिवारी सायंकाळी पणजीतील व्यावसायिक आणि नागरिकांना वाहतूक कोंडीची आणि वाहनांच्या सतत वाजणाऱ्या हॉर्नचा त्रास सहन करावा लागला.

दुपारी तीननंतर शहरातील सतत वर्दळीचा मार्ग असलेल्या १८ जून आणि आत्माराम बोरकर मार्गावर वाहनांच्या रांगा दिसत होत्या. पणजी महानगरपालिकेच्यावतीने कार्निव्हल मिरवणूक जुन्याच मार्गावरून म्हणजे भाऊसाहेब बांदोडकर मार्गावरून काढली. त्यामुळे जुन्या सचिवालयाच्या पूर्वेकडील पेट्रोल पंपापासून बांदोडकर मार्गावरील वाहतूक शहरातून वळविण्यात आली होती.

त्यामुळे शहरात येणारे महात्मा गांधी मार्ग आणि आत्माराम बोरकर रस्त्यावर वाहनांच्या रांगा दिसल्या. तर पणजीतून बाहेर जाण्यासाठी मळ्यातील रस्ता खराब असल्याने अनेकांनी १८ जून रस्त्यावरून जाणे पसंत केले. परंतु या रस्त्यावर काही ठिकाणी मलनिस्सारणाच्या चेंबरची कामे सुरू असल्याने एकेरी वाहतुकीमुळे वाहनांची मोठी कोंडी दिसून आली.

आठ वर्षांपूर्वी पणजीतून कार्निव्हल मिरवणूक पणजी शहराबाहेर नेली होती. राज्यातील पहिले किंग मोमो होण्याचा बहुमान मिळविणारे तिमोतिओ फर्नांडिस १९६७ पासून राज्यस्तरीय कार्निव्हल समितीत आहेत.

Goa Carnival 2024
Goa Azad Maidan: राजधानी पणजीमध्ये असलेले आझाद मैदान या कारणासाठी आहे प्रसिद्ध...

त्यांच्या मागणीनुसारच बांदोडकर मार्गावरील मिरवणूक स्थलांतरित करण्यात आली होती. त्यावेळी पणजीतील व्यावसायिक आम्हाला ग्राहक मिळणार नाहीत, त्यामुळे पूर्वीच्या मार्गावरून मिरवणूक ठेवावी,

अशी मागणी करीत होते. त्यामुळे सरकारला पुन्हा बांदोडकर मार्ग कायम ठेवावा लागला होता. परंतु स्मार्ट सिटीच्या कामांमुळे अगोदरच व्यावसायिक मेटाकुटीला आला आहेत, त्यातच शनिवारच्या वाहतूक कोंडीने अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.

नेटकऱ्यांनी वाहतूक कोंडीची छायाचित्रे शेअर करीत आपला संताप व्यक्त केला आहे. या वाहतूक कोंडीचा परिणाम स्मार्ट सिटीच्या कामावरही झाल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com