Cash For Job Scam: ईडी झोपली आहे का? कॅश फॉर जॉब प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी करणाऱ्या फेरेरांचा घणाघात

Carlos Ferreira Press Conference: सरकारी नोकरी घोटाळ्या प्रकरणाची चौकशी खरे तर ईडी मार्फत होणे गरजेचे होते. पण ईडी झोपली आहे असा घणाघात फेरेरा यांनी केला.
Cash For Job Scam: ईडी झोपली आहे का? कॅश फॉर जॉब प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी करणाऱ्या फेरेरांचा घणाघात
Carlos Ferreira Press ConferenceDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात सध्या कॅश फॉर जॉब प्रकरणावरुन राजकीय वादंग माजला आहे. विरोधक सातत्याने सत्ताधारी सावंत सरकारवर हल्लाबोल करत आहेत. या प्रकरणात सरकारी अधिकाऱ्यांसह सावंत सरकारमधील मंत्री आणि आमदारांचाही हात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.

यातच आज (9 ऑक्टोबर) गोवा काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेवून या प्रकरणी सावंत सरकारवर सडकून टीका केली. सरकारी नोकरभरती घोटाळ्याची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नेते कार्लुस फेरेरा यांनी केली. या प्रकरणाची चौकशी खरे तर ईडी मार्फत होणे गरजेचे होते. पण ईडी झोपली आहे असा घणाघातही फेरेरा यांनी यावेळी केला.

तर दुसरीकडे, सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने कोट्यवधींना लुटणाऱ्यांमागे कोणाचा हात आहे? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी या प्रकरणी येत्या सोमवारी काँग्रेस याबाबत राज्यपालांना पत्र देणार असल्याचेही सांगितले.

Cash For Job Scam: ईडी झोपली आहे का? कॅश फॉर जॉब प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी करणाऱ्या फेरेरांचा घणाघात
Aleixo Sequeira: 'कधी कधी अशी स्थिती निर्माण केली जाते'! Cash For Job Scam प्रकरणी काय म्हणाले मंत्री सिक्वेरा...पहा

पाटकरांचा गौप्यस्फोट

पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना अमित पाटकरांनी मोठा गौप्यस्फोट केला. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील एका पोलिस कॉन्स्टेबलने आपल्या बायकोला सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी जॉब फॉर स्कॅम प्रकरणात अटकेत असलेल्या दीपश्री सावंत गावंस हीला 5 लाख रुपये दिल्याचे पाटकर म्हणाले. या प्रकरणातील संशयित पूजा नाईक हिच्यावर कोणाचा राजकीय वरदहस्त आहे याचे उत्तर राज्य सरकारने द्यावे, असेही ते पुढे म्हणाले.

Cash For Job Scam: ईडी झोपली आहे का? कॅश फॉर जॉब प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी करणाऱ्या फेरेरांचा घणाघात
Cash For Job Scam: मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील पोलिस अडकला कॅश फॉर जॉब प्रकरणात, बायकोच्या नोकरीसाठी दिले 5 लाख; पाटकरांचा गौप्यस्फोट

मोबाईल रेकॉर्डची तपासणी करावी

कर्मचारी भरती आयोगामार्फत नोकरभरती केली जाणार असल्याचे राज्य सरकार सांगत आहे, पण ती काही होत नाही आणि या सरकारची लक्षणे काही ठीक दिसत नाहीत. साध्या वेशातील पोलिस अधिकारी एका मतदारसंघात वावरतो.

तो कधीच पोलिस मुख्यालयात जात नाही असे आपणास वाटत नाही त्या पोलिसाचा मोबाईल नंबर तपासायला हवा, त्याच्या सीडीआर आणि मोबाईल रेकॉर्डची तपासणी करावी. गोमंतकीयांनी आता जागे व्हावी, आम्ही करीत असलेल्या मागणीसाठी राज्यातील जनतेने पाठिंबा द्यावा आणि आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन पालेकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com