Chorotsav: म्हादईच्या वनराईत रंगणारा, थरारक खेळांनी हृदयाचे ठोके चुकवणारा, इतिहासाचा प्रतिध्वनी 'करंझोळचा चोरोत्सव'

Caranzol Chorotsav: ग्रामीण लोकजीवन, परंपर, देव, संस्कृती याचा फार जुना इतिहास सांगणारा करंझोळ गावचा चोरोत्सव आगळा वेगळा आहे.
Caranzol Chorotsav
Chorotsav GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पद्माकर केळकर

ग्रामीण लोकजीवन, परंपर, देव, संस्कृती याचा फार जुना इतिहास सांगणारा करंझोळ गावचा चोरोत्सव आगळा वेगळा आहे. सत्तरी तालुक्यात शिमगोत्सवातील महत्वपूर्ण मानला जाणारा करंझोळ गावचा चोरोत्सव बुधवारी रात्री हजारो भाविकांच्या साक्षीने उत्साहात साजरा करण्यात झाला . चारही बाजूंनी हिरवेगार डोंगर, जवळच असलेली म्हादईची वनराई अशा निसर्गरम्य सानिध्यात पारंपारिकतेने नटलेला करंझोळचा चोरोत्सव वैशिष्ठपूर्ण आहे.

सत्तरी तालुक्यातील, सावर्डे पंचायत क्षेत्रात असलेले गोवा-कर्नाटक सीमेवरचा करंझोळ गाव हा दुर्गम भाग आहे. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला हा चोरोत्सव म्हणजे सांस्कृतिक संचिताचा मोठा भाग असून आतापर्यंत तेथील ग्रामस्थानी उत्सवाची परंपरा अखंडित चालू ठेवली आहे. या चोरोत्सवात मनुष्यास सुळावर चढवणे, त्याला जमिनीत पुरणे असे आगळेवेगळे थरारक प्रकार होतात. ती दृश्ये अंगावर काटा आणणारी असतात.

त्या दृश्यांची पुनरावृत्ती यंदाच्या चोरोत्सवात झाली होती. आठ जणांची शरीरे जमिनीत पुरलेली होती. त्यापैकी चार जणांची डोके जमिनीत पुरलेली होती तर अन्य चार जणांचे अर्धे शरीर जमिनीत पुरलेले व डोके जमिनीवर होते. पुरलेल्या मनुष्यांच्या बाजूला तलवारी. बंदुकीवगैरे शस्त्रे ठेवण्यात आली होती.

Caranzol Chorotsav
Ghodemodni: गुळ्ळे, मोर्ले येथे रंगणार आठ घोड्यांची घोडेमोडणी! ‘भरणूल’ लोककला प्रकाराचे होणार सादरीकरण

करंझोळ गावच्या सातेरी ब्राम्हणी देवीच्या पटांगणात झालेला हा उत्सव रोमांचक असा होता. प्राचीन काळी येथे मराठा समाजाचे अस्तित्व असूनही हेबरांची वसाहत संख्या खुप होती. ज्यावेळी हेबरांनी गावात साम्राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी लढाई झाली होती. मराठ्यांनी हेबरांचा पराभव केला होता. प्राचीनकालचा युध्दजन्य इतिहास गावाला लाभलेला आहे. या इतिहासाचा प्रतिध्वनी म्हणजे या गावचा चोरोत्सव.

Caranzol Chorotsav
Shigmotsav: वोयल्या वोयल्या डोंगरी वाघच्यो गोठणी! लोकसंस्कृती, लोकसाहित्याचा वटवृक्ष 'शिगमोत्सव'

करंझोळच्या शिगमोत्सवाला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. या शिगमोत्सवात पहिल्या दिवशी होळी साजरी करण्यात येते, त्यानंतर रोमटामेळ खेळण्यात येतात. करंझोळ गावातील प्रत्येक घराघरात पालखी जाते. सातव्या दिवशी चोरोत्सव झाल्यानंतर करवल्या उत्सव मंदिरात साजरा होतो व नंतर घोडेमोडणी संपन्न होते. दुर्गम भाग असला तरी करंझोळ गावातील लोकांनी आजही आपल्या परंपरा जतन केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com