Kulem Accident: 'देव तारी त्याला कोण मारी'; कुत्रे आडवे आल्याने झाला विचित्र अपघात; दोघे आश्चर्यकारकरित्या बचावले
Kulem Car Plunges Accident News
फोंडा: जीवाचा गोवा करण्यासाठी आलेल्या पश्चिम बंगालमधील दाम्पत्यावर काळाचा फेरा आला खरा; पण दैवाची साथ मिळाल्याने ‘देव तारी त्याला कोण मारी’, असा प्रत्यय या दाम्पत्याला आला.
कुळेतील मुख्य रस्त्याच्या शेजारी असलेल्या सात मीटर खोल ओहोळात हे दाम्पत्य असलेली कार कोसळली; पण दैव बलवत्तर म्हणूनच हे दाम्पत्य बचावले. या अपघातात दोघांनाही किरकोळ दुखापत झाली. मात्र, कारची पूर्णत: मोडतोड झाली. अपघाताची स्थिती आणि कारची दशा पाहिल्यावर अनेकांच्या तोंडी ‘द ग्रेट इस्केप’ असेच शब्द निघाले.
पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर येथील अभिषेक घोराय आणि पत्नी शायनी हे दाम्पत्य पर्यटनासाठी गोव्यात आले होते. दूधसागर धबधब्यावर जाण्याची त्यांनी आधीच तयारी केली होती. त्यासाठी घोराय दाम्पत्याने ताळगाव येथील ओळखीच्या साहील फ्रान्सिस्को व्हिएगस यांची कार (क्र. जीए-०७-एन-५७०२) घेतली आणि शनिवारी सकाळी कुळेच्या दिशेने कूच केली होती.
अचानक कुत्रे आले आडवे
अभिषेक कार चालवत होता, तर शायनी त्याच्या बाजूला बसली होती. मात्र, पिकळेवाडी-कुळे येथे पोचल्यावर अचानक त्यांच्या गाडीसमोर कुत्रे आडवे आले. त्यावेळी नियंत्रणासाठी अचानक ब्रेकवर पाय ठेवल्यावर गाडी फिरली आणि रस्त्याच्या बाजूला गेली. रस्त्याच्या बाजूलाच ओहोळ असल्याने कार सुमारे सात मीटर खोल ओहोळात कोसळली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

