मडगाव रेल्वे स्थानक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा

आझाद नगरीच्या गाड्यांमुळे गैरसोय, स्थानिकांची कारवाईची मागणी
Car Parked near Madgaon Railway Station
Car Parked near Madgaon Railway Station Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : मडगाव येथील कोकण रेल्वे स्थानक प्रकल्पाच्या बांधकामावेळी त्या ठिकाणी असलेल्या परप्रांतियांच्या झोपड्या इतरत्र स्थलांतरित करण्यात आल्या होत्या. यातील काही झोपड्या आझाद नगरी येथे स्थलांतरित करण्यात आल्या होत्या. मात्र आता याठिकाणी अनेक बेकायदेशीर झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. असं असलं तरीही त्यांच्या गाड्या कोकण रेल्वे स्थानकाच्या मुख्य रस्त्यावर पार्किंग करण्यात येत असल्याने येथील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत असल्याने ही वाहने हटविण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

Car Parked near Madgaon Railway Station
गोव्यातील तरुणाचा तिलारी धबधब्यावर बुडून मृत्यू

कोकण रेल्वे स्थानकाची निर्मिती करण्याअगोदर याठिकाणी 20 ते 30 च्या आसपास झोपड्या होत्या. यातील काही झोपड्यांचे स्थलांतरण दक्षिण गोवा अग्निशमन दलाच्या कार्यालयामागे, तर काही झोपड्यांचे स्थलांतरण डेक्कन टायरजवळ असलेल्या शेतजमिनीत करण्यात आले होते. त्यावेळेस याठिकाणी काही मोजक्याच झोपड्या होत्या मात्र आता याठिकाणी 100 च्या आसपास बेकायदेशीर झोपड्या तयार झाल्या आहेत.

झोपडपट्टीतील रहिवाशांकडे दुचाकी आणि चारचाकी गाड्या आहेत. मात्र त्यांना गाड्या पार्किंगची सुविधा नसल्याने मुख्य रस्त्यावर पार्किंग करावे लागत आहे. याठिकाणी एमसीसी क्रीडा मैदान ते कोकण रेल्वे स्थानक जंक्शनपर्यंत जाण्याच्या रस्त्यावर डाव्या बाजूला एका ओळीने सलग गाड्या पार्क करण्यात येत आहेत. त्यामुळे इतर वाहनांना या रस्त्यावरून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे.

Car Parked near Madgaon Railway Station
प्रतापसिंग राणेंच्या कॅबिनेट दर्जाला आव्हान देणारी याचिका अखेर दाखल

अशा प्रकारे वाहने उभी करण्यात येत असल्याने अनेकवेळा अपघात घडले आहेत. याप्रकरणी मडगाव नगरपालिकेचे नगरसेवक महेश आमोणकर यांनी स्थानिक नगरसेवक आणि आमदार यांना जबाबदार धरलं आहे. त्यांनी याप्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली असून कारवाईची मागणी केली आहे. येथे गाड्या पार्क करण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसंच प्रवाशांना स्टेशनवर पोहोचण्यासाठी उशीर लागत असल्याने त्यांचीही गैरसोय होत असल्याचं चित्र आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com