Fatorda Car Fire: फातोर्डा जिल्हा कोर्टाबाहेर कारला भीषण आग! गाडी जळून खाक, जीवितहानी टळली; कारण अद्याप गुलदस्त्यात

Fatorda Car Fire Incident: फातोर्डा येथे जिल्हा न्यायालयाच्या अगदी समोर एक धक्कादायक घटना घडली. रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या एका चारचाकी गाडीने अचानक पेट घेतला.
Fatorda Car Fire Incident
Fatorda Car FireDainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा: फातोर्डा येथे जिल्हा न्यायालयाच्या अगदी समोर एक धक्कादायक घटना घडली. रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या एका चारचाकी गाडीने अचानक पेट घेतला. या भीषण आगीत ती कार पूर्णपणे जळून खाक झाली. ही आग इतकी मोठी होती की आगीच्या ज्वाळा दूरपर्यंत दिसत होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (20 नोव्हेंबर 2025) ही घटना फातोर्डा (Fatorda) जिल्हा न्यायालयाच्या समोर घडली. काही अज्ञात कारणामुळे या कारला आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. लोकांनी तातडीने अग्निशमन दलाला संपर्क साधला.

Fatorda Car Fire Incident
Fatorda Stadium Leak: 'आनी हेंका रोनाल्डो जाय', ऐन सामन्यात फातोर्डा स्टेडियमला गळती, गोव्याच्या फुटबॉल उत्सवाला गालबोट; Watch Video

मडगाव अग्निशमन दलाची तत्परता

आगीची माहिती मिळताच मडगाव अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी कोणताही वेळ न दवडता तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याचा मारा सुरु केला. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांमुळे काही वेळेतच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले.

मोठा अनर्थ टळला

आग (Fire) लागलेल्या ठिकाणी जिल्हा न्यायालय परिसर असल्याने तसेच रस्त्याच्या कडेला इतर वाहनेही उभी असल्याने आग पसरण्याचा मोठा धोका होता. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आग इतर वाहनांना किंवा जवळील कोणत्याही इमारतीपर्यंत पसरली नाही आणि एक मोठा अनर्थ टळला.

Fatorda Car Fire Incident
Fatorda Stadium: स्टेडियमसाठी जागा दिलेल्यांना मिळणार घराची मालकी, मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन; विजय सरदेसाईंनी घडवून आणली कुटुंबीयांची भेट

या घटनेमध्ये कार पूर्णपणे जळून खाक झाली असली, तरी सुदैवाने कोणतीही व्यक्ती जखमी झालेली नाही किंवा कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. फातोर्डा पोलीस आणि अग्निशमन दल आता या घटनेची नोंद घेऊन पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com