Goa Maritime Board: राज्य सागरी मंडळ निर्मितीला गती, लवकरच अधिसूचना; चेअरमनपद मुख्यमंत्र्यांकडेच राहणार

Port Terminal Inauguration: कॅप्टन ऑफ पोर्ट्स टर्मिनल’च्या नामकरण प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. काही दिवसांत राज्य सागरी मंडळ (स्टेट मरिटाईम बोर्ड) निर्मितीला गती मिळणार असून अधिसूचनाही येण्याची शक्यता आहे.
Goa Maritime Board
Port Terminal InaugurationDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : ‘कॅप्टन ऑफ पोर्ट्स टर्मिनल’च्या नामकरण प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. काही दिवसांत राज्य सागरी मंडळ (स्टेट मरिटाईम बोर्ड) निर्मितीला गती मिळणार असून अधिसूचनाही येण्याची शक्यता आहे. या मंडळाचे चेअरमनपद मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मांडवी नदीत उभारलेल्या टर्मिनलच्या इमारतीचे लोकार्पण सोमवारी केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते होणार होते. परंतु, गोव्याने मरिटाईम बोर्डच स्थापन केले नसल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांच्या कानावर पडली. त्यामुळे सोनोवाल यांनी या प्रकाराबाबत माहिती जाणून घेतली आणि या कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. परिणामी, या इमारतीच्या लोकार्पणाचा कार्यक्रम बंदर कप्तान विभागाला आदल्या दिवशी रद्द करावा लागला.

सागरी किनारपट्टी लाभलेल्या राज्यांनी आपापल्या ठिकाणी राज्य सागरी मंडळे स्थापन केली आहेत. परंतु, गोव्याला फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदत असतानाही मंडळ स्थापन करण्यात आले नाही. या मंडळाचे चेअरमनपद मिळावे, अशी अपेक्षा बंदर कप्तान खात्याच्या मंत्र्यांना असल्याची चर्चा खात्यात होती. त्यामुळेच फाईलवर बंदर कप्तानच्या सचिवांनी लिहिलेली नोंद मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणारी ठरली.

Goa Maritime Board
CM Fellowship Goa: मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी 20 जागा; तरुणांना शासनाच्या विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी

माजी सनदी अधिकारी एल्विस गोम्स यांनी रविवारी सकाळीच ‘एक्स’ या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट टाकली. त्यामुळे बंदर कप्तान विभागाला कार्यक्रम रद्द करावा लागला. त्यांनी या पोस्टमध्ये बंदर कप्तान खाते नव्हे, तर ‘स्टेट मरिटाईम बोर्ड’ असे असायला हवे होते. त्यासाठी त्यांनी कायद्याचे दाखलेही दिले होते. या सर्व पार्श्वभूमीवर विभागात गोंधळ उडाला आणि केंद्रीय मंत्र्यांनीही येण्याचे टाळल्याने कार्यक्रम रद्द करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. आता मंडळ निर्माण करण्याच्या प्रक्रियेला सरकारकडून गती मिळाली असल्याने काही दिवसांत ते स्थापन होईल, असे संकेत मिळाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com