Cape News : आर्थिक बळकटीसाठी विद्यार्थ्यांनी कौटिल्याचे अर्थशास्त्र वाचावे : भूषण सावईकर

Cape News : केपे महाविद्यालयात ‘अर्थमंथन ०.४’ प्रश्‍‍नमंजूषा स्पर्धा उत्साहात
Cape
CapeDainik Gomantak
Published on
Updated on

Cape News :

केपे, पर्यावरणावर विपरित परिणाम होणार नाही याची काळजी घेत आर्थिक विकासाला चालना द्यावी.

आर्थिक पातळीवर बळकटी आणायची असेल तर विद्यार्थ्यांनी कौटिल्याचे अर्थशास्त्र वाचावे, असे आवाहन उच्चशिक्षण संचालक भूषण सावईकर यांनी केले. कला, वाणिज्य आणि विज्ञान सरकारी महाविद्यालय केपे येथील अर्थशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या अर्थमंथन : ०.४ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजूषा स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. जॉयदीप भट्टाचार्य, उपसंचालक डॉ. रेंजी जॉर्ज अंबलूर, डॉ. विक्रांत मुदलियार, प्रा. कृष्णकुमार बांडोळकर आदी मान्यवर उपस्थित होते. अर्थशास्त्र विभागाच्या सस्टेनेबिलिटी सेलच्या पुढाकाराने ‘टुवर्ड्स अ सस्टेनेबल फ्युचर : एक्सप्लोरिंग क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंक आणि कार्बनफ्रुटप्रिंटस’ या शीर्षकाच्या ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले.

दामोदर महाविद्यालयाला विजेतेपद

मडगाव येथील श्री दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्‍ड इकॉनॉमिक्सचे एर्विल हिल्मानो, बार्रेटो वाझ रॉड्रिगीस आणि वैभव चेतन बांदोडकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. खांडोळा कला,

विज्ञान आणि वाणिज्य शासकीय महाविद्यालयाच्या वीणा एम. आणि प्रवीण कर्ण यांनी दुसरा क्रमांक तर रोझरी कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड आर्टस्‌ नावेलीच्या हॅस्लर डेल्टन कार्दोझ आणि पीयूष अग्रवाल यांना तिसरा क्रमांक मिळाला. उत्तेजनार्थ बक्षिसे सेंट झेवियर कॉलेज म्हापसा व श्रीधर काकुलो महाविद्यालय म्हापसा यांना प्राप्‍त झाले.

Cape
Goa Politics: ‘विकसित नवभारता’साठी दोन्ही भाजप उमेदवारांना विजयी करा

१३ महाविद्यालयांनी घेतला स्‍पर्धेत सहभाग

या स्पर्धेतील प्राथमिक फेरीसाठी राज्यातील १३ महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला. त्यातून पाच महाविद्यालये अंतिम फेरीसाठी निवडण्यात आली. अर्थशास्त्र विभागातील डॉ. विक्रांत मुदलियार, प्रा. कृष्णकुमार बांडोळकर यांनी प्रश्नमंजूषा मास्टरची भूमिका बजावली.

प्रश्नमंजूषा स्पर्धेचा फायदा केवळ सहभागींनाच होतो असे नाही तर प्रेक्षकांच्या ज्ञानात देखील अशा स्पर्धामुळे भर पडत असते. त्यामुळे अशा स्पर्धांचे महत्त्व मोठे आहे. विद्यार्थ्यांनी सक्रियपणे अशा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवावा.

- प्रो. डॉ. जॉयदीप भट्टाचार्य, प्राचार्य (शासकीय महाविद्यालय केपे)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com