Cape News : बाबू समर्थकांची नाराजी काँग्रेस पक्षाच्‍या पथ्‍यावर! केपेत समीकरणे बदलणार

Cape News : भाजपवर पुन्‍हा आघाडी मिळविण्‍यासाठी एल्‍टन डिकॉस्‍टांनी कंबर कसली
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Dainik Gomantak

श्‍‍यामकांत नाईक

Cape News :

केपे,लोकसभा निवडणूक आता महिन्‍यावर येऊन ठेपली आहे. भाजप आणि रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स (आरजी) या पक्षांनी आपापला प्रचार जोरदार सुरू केला आहे. पण काँग्रेसला अजून आपला उमेदवार जाहीर करता आलेला नाही.

त्‍यामुळे या पक्षात शांतताच आहे. काही उत्‍सुक उमेदवार आपापला वैयक्तिक प्रचार करण्‍यात मग्न आहेत.

आजवरचा इतिहास पाहिला तर केपे मतदारसंघ हा काँग्रेसच्‍या बाजूने राहिला असल्‍याचे दिसते. या मतदारसंघातून बाबू कवळेकर हे चारवेळा तर एल्टन डिकॉस्‍टा हे एकदा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीतही या मतदारसंघातून काँग्रेसला आघाडी मिळाली होती. यावेळी केपेचे माजी आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर हेसुद्धा लोकसभेच्या भाजप उमेदवारीसाठी इच्छुक होते, पण त्यांना ही उमेदवारी मिळू न शकल्याने त्यांचे कार्यकर्ते बरेच नाराज झाले आहेत. त्‍याचा फायदा यावेळी काँग्रेस पक्षाला होऊ शकतो.

केपे मतदारसंघात भाजप व काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांचेच कार्यकर्ते आहेत. भाजपसह ‘आरजी’ने प्रचार सुरू केला आहे. या मतदारसंघात अनुसूचित जमातीच्या लोकांचा जास्त भरणा आहे. हे लोक कोणत्या पक्षाबरोबर राहतात, हे महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे. गेल्या चार निवडणुकांमध्‍ये हे लोक कवळेकर यांच्याबरोबर होते.

पण यावेळी ते भाजपमध्‍ये असल्‍याने परिस्‍थिती वेगळी आहे. जर हेच चित्र लोकसभा निवडणुकीत राहिल्यास काँग्रेसला साधारण दीड हजार मतांची आघाडी या मतदारसंघात मिळू शकते.

ऐनवेळी भाजपने ही उमेदवारी पल्‍लवी धेंपे यांना दिल्याने कवळेकर यांचे समर्थक बरेच नाराज झालेले आहेत. असे असले तरी त्यांचे विरोधक मात्र बरेच खूष झाले आहेत.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत केपे मतदारसंघात आमच्याजवळ कोणताही मोठा नेता नव्हता. पण त्यावेळी आम्ही सर्व भाजप कार्यकर्त्यांनी काम करून १८०० मतांची आघाडी भाजपला मिळवून दिली होती. यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परत एकदा देशाचे नेतृत्व करण्याची संधी देण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आपले हेवेदावे बाजूला सारून स्वतःला कामात झोकून दिल्यास भाजपला किमान तीन हजार मतांची आघाडी मिळू शकते.

- योगेश कुंकळयेकर, भाजप कार्यकर्ता

केपेचे आमदार एल्टन डिकॉस्‍टा यांनी ज्याप्रमाणे मतदारसंघात विकासकामे करण्यावर भर दिला आहे ते पाहता काँग्रेसला किमान चार हजार मतांची आघाडी मिळू शकते. गेल्या वेळी ३६०० मतांची आघाडी मिळाली होती, ती आता दुप्पट करण्याचा प्रयत्न करणार आहेात. बाबू कवळेकर हे भाजप उमेदवारीसाठी इच्छुक होते. पण त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्‍यांचे कित्‍येक कार्यकर्ते नाराज आहेत. याचा फायदा काँग्रेस पक्षाला होणार आहे.

- अवधूत आमोणकर, काँग्रेस गटाध्यक्ष (केपे)

Lok Sabha Election 2024
Honda Industrial Estate: वसाहत चार दशकांपूर्वीच स्थापन मात्र अजूनही वाहतूकीचे नियोजन नाही

अल्‍पसंख्‍यांक मतदारांची भूमिका निर्णायक

केपे मतदारसंघातील बेतुल, खणगिणी, आंबावली, असोल्डा व केपे बाजारात काँग्रेस पक्षाने प्रत्येक निवडणुकीत आघाडी घेतली आहे. यावेळीसुद्धा हे भाग लोकसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर राहणार असल्याचे दिसून येते.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी कितीही प्रचार केला तरी या भागात अल्‍पसंख्‍यांक मतदारांचा टक्का जास्त असल्याने त्‍याचा फायदा त्यांना होणार आहे. भाजपने गेल्या अनेक निवडणुकांमध्‍ये ही मते भाजपकडे वळविण्याचा बराच प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com