Cape News : एल्‍टन डिकॉस्ता हे स्‍वघोषित ‘जायन्‍ट किलर’ : बाबू कवळेकर

Cape News :एल्‍टन डिकॉस्‍ता यांनी कितीही आघाडीचा दावा केला तरी केपे मतदारसंघात या लाेकसभा निवडणुकीत भाजपलाच आघाडी मिळेल, असा दावा कवळेकर यांनी केला.
 Babu Kavlekar
Babu KavlekarDainik Gomantak

Cape News :

मडगाव, केपेचे आमदार एल्‍टन डिकॉस्‍ता हे स्‍वघोषित ‘जायन्‍ट किलर’ असून येत्‍या विधानसभा निवडणुकीत त्‍यांना त्यांची जागा काय ती केपेचे मतदार दाखवून देतील, अशी प्रतिक्रिया माजी उपमुख्‍यमंत्री आणि केपेचे माजी आमदार बाबू कवळेकर यांनी व्‍यक्‍त केली.

एल्‍टन डिकॉस्‍ता यांनी कितीही आघाडीचा दावा केला तरी केपे मतदारसंघात या लाेकसभा निवडणुकीत भाजपलाच आघाडी मिळेल, असा दावा कवळेकर यांनी केला.

केपे मतदारसंघात भाजप उमेदवार पल्‍लवी धेंपे यांना भरघोस मते मिळावी यासाठी आपण केपे पालिका परिसरासह आठही पंचायत क्षेत्रात काम केले आहे. या निवडणुकीत मला भाजपाने उमेदवारी दिली नाही म्‍हणून माझे कार्यकर्ते नाराज होते.

त्‍यामुळे सुरवातीला त्‍यांना भाजपकडे आकर्षित करण्‍यासाठी मला थोडाफार त्रास झाला, ही गाेष्‍ट जरी खरी असली तरी भाजपने जो निर्णय घेतला तो पक्षाच्‍या हितासाठी घेतला, हे मी त्‍यांना पटवून देण्‍यात यशस्‍वी ठरलाे. त्‍यानंतर माझ्‍या सर्व कार्यकर्त्यांनी भाजपसाठी झटून काम केले, असे कवळेकर म्‍हणाले.

या निवडणुकीत काँग्रेसतर्फे कॅप्‍टन विरियातो फर्नांडिस यांना रिंगणात उतरविले असले तरी एल्‍टन स्‍वत: पूर्ण दक्षिण गोव्‍याचे ‘सुपर कॅप्‍टन’ झाल्‍यासारखे वावरत होते. मात्र, त्‍यांची जागा काय हे आता या निवडणुकीच्‍या निकालानंतर सर्वांना कळणारच आहे, असे कवळेकर म्‍हणाले.

 Babu Kavlekar
Goa News : गोव्यात ७६.९९ मतदान टक्केवारीने रचला नवा विक्रम; निवडणूक आयोगाची अंतिम आकडेवारी

एल्‍टन डिकॉस्‍ता यांनी कितीही वल्‍गना केल्‍या तरी केपे मतदारसंघात ते काँग्रेसला आघाडी मिळवून देऊ शकत नाहीत. वास्‍तविक डिकॉस्‍ता यांनी मागच्‍या दोन वर्षांत मुख्‍यमंत्री आणि अन्‍य भाजप मंत्र्यांचे गुणगान करून स्‍वत:ची बरीच कामे करून घेतली. मात्र, या निवडणुकीत त्‍यांनी मुख्‍यमंत्री आणि भाजपवर जेवढी जहरी टीका केली तशी टीका स्‍वत: उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनीही केली नाही.

- बाबू कवळेकर,

माजी उपमुख्यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com