Cape News :
Cape News : Dainik Gomantak

Cape News : अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘होली क्रॉस’च्या विद्यार्थ्यांची भेट

Cape News : त्‍यानंतर या विद्यार्थ्यांच्या गटाने नावेली येथील जिल्‍हा वाचनालयाला भेट देऊन पाहणी केली. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्‍या विषयांचे ज्ञान मिळावे, यासाठी ही शैक्षणिक सहल आयोजित केली होती, अशी माहिती मुख्‍याध्‍यापिका रश्‍‍मी डिसोझा यांनी दिली.
Published on

Cape News :

केपे, कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स) आणि रोबोटिक्‍स हा सध्‍याच्‍या शैक्षणिक उपक्रमाचा अविभाज्‍य भाग बनत असताना या तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना व्‍हावी, यासाठी केपे येथील आयडियल एज्‍युकेशन सोसायटीच्‍या होली क्रॉस विद्यालयाच्‍या विद्यार्थ्यांनी वेर्णा येथील पाद्री कॉन्‍सेसांव अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट दिली आणि या तंत्रज्ञानाविषयी माहिती जाणून घेतली.

या विषयात रुची असलेल्‍या सहावी ते नववी इयत्तेतील ३० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे कोडींग कसे करतात आणि त्‍याद्वारे रोबाेटिक्‍स तंत्रज्ञान कसे विकसित केले जाते, ते कसे वापरले जाते याची माहिती या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील तज्ज्ञ शिक्षकांनी दिली. या उपक्रमात होली क्रॉसचे शिक्षकही सहभागी झाले होते.

Cape News :
Goa News : अर्थ कसा लावता यावर कायद्याचे यश अवलंबून : न्या. श्रीराम मोडक

त्‍यानंतर या विद्यार्थ्यांच्या गटाने नावेली येथील जिल्‍हा वाचनालयाला भेट देऊन पाहणी केली. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्‍या विषयांचे ज्ञान मिळावे, यासाठी ही शैक्षणिक सहल आयोजित केली होती, अशी माहिती मुख्‍याध्‍यापिका रश्‍‍मी डिसोझा यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com