केपे बाजार; उद्‍घाटन होऊनही वापर नाही!

दुकानदारांना प्रतीक्षा: प्रकल्पाचा अद्याप पालिकेकडे ताबाच नाही
 Goa Market
Goa Market Dainik Gomantak
Published on
Updated on

केपे: केपे बाजार प्रकल्पाचे उदघाटन होऊन तीन महिने उलटले तरी अद्याप बरेच काम बाकी असल्याने ‘जीसुडा’ कडून केपे पालिकेने सदर प्रकल्प ताब्यात घेतलेला नाही.

केपे पालिकेने ‘जीसुडा’ अंतर्गत नवीन पालिका बाजार प्रकल्पाची इमारत उभारली असून निवडणुकीपूर्वी मोठ्या थाटामाटात या प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले होते, परंतु अद्याप पालिकेने या इमारतीचा ताबा घेतला नसल्याने स्थलांतरित करण्यात आलेल्या दुकानदारांना आपली दुकाने कधी मिळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीच्या घाईगडबडीत माजी उपमुख्यमंत्री तथा केपेचे माजी आमदार बाबू कवळेकर व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले होते. बाजार प्रकल्पाचे उदघाटन झाल्याने बरेच लोक या इमारतीतील दुकानांचा लिलाव पालिका कधी करणार याची वाट पाहत आहेत.

 Goa Market
Goa Shipyard Recruitment 2022: गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये 264 पदांची भरती

बाजार प्रकल्प तयार होऊनही केपेतील रविवारचा बाजार अजून मुख्य रस्त्याच्या दुतर्फा भरत असल्याने दर रविवारी कुंकळ्ळीला जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची कोंडी होत असल्याने लोकांना बराच त्रास होतो. मासळी, भाजी, तसेच मटण विक्री करणाऱ्यांसाठी सदर नवीन प्रकल्पात जागा नसल्याने यावर्षीही सदर व्यवसाय करणाऱ्या गाडेधारकांना आहे त्याच ठिकाणी व्यवसाय करावा लागेल, असे दिसत आहे.

 Goa Market
Goa Health camp: 'धकाधकीच्या जीवनात स्वत:चे आरोग्य जपा'

Goa Health camp: 'धकाधकीच्या जीवनात स्वत:चे आरोग्य जपा'सदर प्रकल्पात काही कामे अपूर्ण राहिली असल्याने अद्याप याचा ताबा पालिकेने घेतलेला नाही. उर्वरित कामे पूर्ण झाल्यानंतर ‘जीसुडा’ कडून या प्रकल्पाचा कायदेशीररित्या ताबा घेऊन दुकानांचा लिलाव करण्यात येईल तसेच जुन्या इमारतीतून स्थलांतरित केलेल्यांना दुकाने देण्यात येतील.

-नितीन कोटारकर , केपे पालिकेचे अभियंता

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com