Goa Marriage: बायको मिळेना, लग्न जुळेना ! गोवेकरांसमोर बिकट समस्या

मागील काही वर्षांत लग्न लवकर जुळेना व जुळले तर ते टिकेना, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
Marriage
MarriageDainik Gomantak
Published on
Updated on

लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात. जेव्हा योग्य वेळ येते तेव्हाच लग्न होतं. परंतु ती योग्य वेळ येण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतात. त्यामुळेच मग अनेक मंडळी Matrimonial Site, विवाहसंस्था, नातेवाईकांकडे चौकशी करणे अशा गोष्टी करतात. परंतु तरी देखील काही जणांची लग्न होत नाहीत. त्यामुळे तिशीच्या आत मुला- मुलींचे लग्न करण्यावर पालकांचा भर असतो.

मात्र, अनेकदा आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्नच जुळत नाही, असे पालक सांगताना दिसतात. याला वेगवेगळी कारणे असू शकतात. मात्र, मागील काही वर्षांत चित्र बदलले आहे. लग्न लवकर जुळेना व जुळले तर ते टिकेना, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मतभेद, अहंकार, आर्थिक स्वातंत्र्य आदी गोष्टी त्याला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे अनेकदा लग्न होऊन वर्ष होण्यापूर्वी घटस्फोट होतात.

सहा ते साडेसहा हजार लग्ने होतात,त्यातील दोन ते पाच टक्के घटस्फोट-

राज्यात दरवर्षी सरासरी सहा ते साडेसहा हजार लग्ने होतात. त्यातील दोन ते पाच टक्के घटस्फोट होतात. गेल्यावर्षी, 2011 मध्ये पहिल्या 6 महिन्यांत 4 हजार313 लग्नांची नोंद झाली तर 108 जणांचे घटस्फोट झाल्याची नोंद आहे. 2020 मध्ये राज्यात 6 हजार 379 लग्नांची नोंद झाली तर त्याचवर्षी 315 जणांचे घटस्फोट झाल्याचीही नोंद आहे. हे प्रमाण पाच टक्क्यांपर्यंत आहे. कुटूंब व्यवस्थेतील बदल, अपेक्षांचे ओझे, समजुतदारपणाचा अभाव, ताण-तणाव ही घटस्फोटामागील कारणे आहेत.

Marriage
Hair Care Tips: घनदाट व लांब केसांसाठी घरच्या घरी बनवलेले 'हे' तेल लावा

एकत्र कुटुंब नको-

सध्या विभक्त कुटुंब पद्धतीची फॅशन झाली आहे. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनंतर पती व पत्नी एकत्र कुटुंब पद्धतीत न राहता स्वत:चा वेगळा संसार थाटू इच्छितात. मात्र, यावरून खटके उडतात व नंतर प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचते.

Marriage
Sleeping On Stomach : जर तुम्हीही पोटावर झोपता, भविष्यात तुम्हाला 'या' समस्यांना जावे लागेल सामोरे

दीड वर्षात 429 जोडप्यांचे घटस्फोट-

प्राप्त आकडेवारीनुसार, 2020 मध्ये राज्यात 6 हजार 379 लग्नांची नोंद झाली तर त्याचवर्षी 315 जणांचे घटस्फोट झाल्याचीही नोंद आहे. 2021 मध्ये पहिल्या 6 महिन्यांत 4 हजार 313 लग्नांची नोंद झाली तर 108 जणांचे घटस्फोट झाल्याची नोंद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com