Candolim Murder Case: कांदोळीतील 'ते' हत्याकांड कौटुंबिक वादातून! पोलिसांचा प्राथमिक अंदाज

या हत्‍याकांडामुळे संपूर्ण गोवा हादरून गेला आहे.
Candolim Murder Case
Candolim Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Candolim Murder Case: कांदोळी येथे एका पित्याने पोटच्या दोन मुलांचा गळा आवळून खून करत स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. ओर्डा-कांदोळी येथे शनिवारी रात्री उशिरा याबाबतची माहिती उघडकीस आली. या हत्‍याकांडामुळे संपूर्ण गोवा हादरून गेला आहे. जॉय फर्नांडिस असे हत्या केलेल्या बापाचे नाव आहे. तर मुलगी अनानिया (13) आणि मुलगा जोसेफ (8) अशी मुलांची नावे आहेत. 

Candolim Murder Case
Candolim Murder Case: दोन मुलांचा खून करून बापाने केली आत्‍महत्‍या

या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही. पण, कौटुंबिक वादातूनच ही घटना झाली असावी असा प्राथमिक अंदाज उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वल्सान यांनी सांगितले आहे. याप्रकरणी जॉय फर्नांडिस यांची पत्नी, आई यांच्याशी चर्चा केल्याचे वल्सान म्हणाले. दरम्यान, या घटनेच्या सर्व शक्यता तपासल्या जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जॉय हा तियात्र कलेशी निगडित होता. ख्रिस्ती समाजात तो परिचित होता. कळंगुटचे माजी आमदार तोमाझीन कार्दोज यांच्या कार्यकाळात कला अकादमी पुरस्कृत तियात्र अकादमीवरही जॉयने पाच वर्षे काम केले होते. गावातील चर्च संघटना तसेच एका राष्ट्रीय पक्षाच्या कळंगुट गट समितीवरही तो बराच काळ सक्रिय होता.

Candolim Murder Case
Candolim Murder Case: आठ वर्षांपासून बेरोजगार, पत्नीसोबतच्या वादातून मुलांचा बळी?

जॉय हे बरीच वर्षे तियात्र अकादमीत कामाला होते. जिल्हा पंचायत निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना नैराश्य आले होते. गेल्या आठ वर्षांपासून ते बेरोजगार होते. मात्र, सामाजिक कामात जॉय सहभागी व्हायचे. जॉय आणि इर्निया या दोघांमध्ये सतत वाद व्हायचे अशी माहिती समोर आली आहे. इर्निया या खासगी शाळेत शिक्षिका होता. पती- पत्नीमधील वादातूनच जॉय यांनी हे टोकाचं पाऊल उचलले असावे. अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Birch By Romeo Lane bail cancelled
Teachers role in shaping new generation
America Double Murder Case
Goa Uncle Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com