Suchana Seth
Suchana SethDainik Gomantak

Candolim Murder Case: चार वर्षीय मुलाचे हत्या प्रकरण; सूचना सेठच्या वकिलाने केला मोठा दावा

सूचनाचे वकील अरुण ब्रास दे सा यांनी गोवा पोलिसांनी सादर केलेला मानसिक फिटनेस अहवाल चुकीचा असल्याचा दावा केला आहे.
Published on

Suchana Seth Case

आपल्याच चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याच्या आरोपात अटकेत असणारी सूचना सेठ प्रकणात नवी अपडेट समोर आली आहे. सूचनाच्या मानसिक मूल्यांकन अहवाल तिची मानसिक स्थिती एकदम ठिक असल्याचे समोर आले होते.

दरम्यान, सूचनाचे वकील अरुण ब्रास दे सा यांनी गोवा पोलिसांनी सादर केलेला मानसिक फिटनेस अहवाल चुकीचा असल्याचा दावा केला असून, सूचनाची मानसिक स्थिती ठिक नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सूचना सेठच्या मानसिक आरोग्य स्थितीची तपासणी करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचे वैद्यकीय मंडळ तयार करावे, अशी मागणी सेठच्या वकिलाने कोर्टाकडे केली.

सरकारी वकिलाने त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत सेठ मानसिकदृष्ट्या पूर्णपणे निरोगी असल्याचे सांगितले.

मुलाच्या हत्येप्रकरणी सूचना सेठ अटकेत आहे. सूचानाची मानसिक स्थिती ठिक नसल्याचा दावा तिच्या वडिलांनी केला होता. याबाबत योग्य तपासणी केली जावी अशीही मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, सूचनाची मानसिक चाचणी केल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली होती.

Suchana Seth
Goa CM Kerala Visit: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 'इलेक्शन मोड'मध्ये; केरळमध्ये घेतला 'लोकसभा' तयारीचा आढावा

या चाचणीत सूचनाची मानसिक स्थिती उत्तम असल्याचे अहवालातून समोर आले होते. पण, पोलिसांनी दाखल केलेला हा अहवाल चुकीचा असल्याचा दावा आता सूचनाचे वकील अरुण ब्रास दे सा यांनी केला. मात्र, सरकारी वकिलांनी तो दावा खोडून काढला.

सूचना सेठ 06 जानेवारी रोजी चार वर्षीय मुलासोबत गोव्यात आली होती. मुलाची हत्या करुन बेंगळुरुला जात असताना चित्रकुट जिल्ह्यात 08 जानेवारीला तिला अटक करण्यात आली होती. मुलाचा मृतदेह तिने बँगेत भरला होता. गोव्यातून बेंगळुरुला जाण्यासाठी तिने कॅब बुक केली, सतर्क कॅब चालकाच्या मदतीने सूचनाला अटक करण्यात यश आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com