Gold Theft Case: कांदोळी ज्वेलरी चोरीचा पर्दाफाश, रायगडमधून टोळी गजाआड; 16 पैकी 15 अंगठ्या हस्तगत

Candolim Gold Theft Case Goa: कांदोळी येथील ‘उदय गोल्डस्मिथ ज्वेलरी शॉप’मधून दिवसाढवळ्या १६ सोन्याच्या अंगठ्या चोरून पसार झालेल्या आंतरराज्य टोळीचा कळंगुट पोलिसांनी यशस्वी छडा लावला आहे.
Candolim Gold Theft Case Goa
Candolim Gold Theft Case GoaDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: कांदोळी येथील ‘उदय गोल्डस्मिथ ज्वेलरी शॉप’मधून दिवसाढवळ्या १६ सोन्याच्या अंगठ्या चोरून पसार झालेल्या आंतरराज्य टोळीचा कळंगुट पोलिसांनी यशस्वी छडा लावला आहे.

तांत्रिक तपास आणि आंतरराज्य समन्वयाच्या जोरावर पोलिसांनी या टोळीला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील माणगाव परिसरातून अटक केली असून त्यांच्याकडून १५ सोन्याच्या अंगठ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

ही घटना २६ जून २०२६ रोजी दुपारी साडेबाराच्‍या सुमारास घडली होती. काही अज्ञात आरोपींनी दुकानातून सोन्याच्या अंगठ्या चोरून पलायन केले होते. याबाबत दुकानदार उदय शिरोडकर यांनी कळंगुट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने विशेष पथक स्थापन करून तपास सुरू केला.

पर्वरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वेश कर्पे आणि कळंगुटचे पोलिस निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक परेश सिनारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपींचा माग काढला. ते महाराष्ट्रात पळून गेल्याची माहिती मिळताच पथक रायगड जिल्ह्यात रवाना झाले आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने लोणे (माणगाव) येथील हॉटेलवर छापा टाकत पाच जणांना अटक करण्यात आली.

अटक केलेल्या संशयित आरोपींमध्ये पांडुरंग गणपत पवार (७६) मंगेश भाऊ सुर्वे (३५), सतीश नामदेव शिंदे (४१) ज्योत्स्ना आनंद पवार (६५, सर्व रा. महाड) व विमल राजेंद्र जाधव (६१, सातारा) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या टोळीत ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

Candolim Gold Theft Case Goa
Goa Sindhudurg Sand Transport: गोवा-सिंधुदुर्ग रेती वाहतूक 8 दिवसांत सुरळीत! नीलेश राणेंचा विश्‍‍वास

संशयितांकडून चोरीतील १६ पैकी १५ सोन्याच्या अंगठ्या हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित एका अंगठीचा शोध सुरू आहे. या चोरीमागील नेमका कट आणि त्यामागील भूमिका याचा सखोल तपास सुरू आहे. या कारवाईत पोलिस कॉन्स्टेबल विजय नाईक, राजेश कांदोळकर आणि योगेश बोर्डेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पुढील तपास उपनिरीक्षक योगेश मांद्रेकर करत आहेत.

हॉटेलवर टाकला छापा; सापळा रचून आवळल्‍या मुसक्‍या

तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा माग काढण्यात यश, लोणे-माणगाव येथील हॉटेलवर छापा, स्थानिक पोलिसांच्या मदतीने पाच संशयित आरोपी ताब्यात, १५ सोन्याच्या अंगठ्या हस्तगत.

गुन्ह्याचा घटनाक्रम

२६ जून २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता चोरीची घटना.

कांदोळी येथील ‘उदय गोल्डस्मिथ ज्वेलरी शॉप’ लक्ष्य.

१६ सोन्याच्या अंगठ्या चोरून आरोपींचे पलायन.

तक्रार दाखल होताच कळंगुट पोलिसांचा तत्काळ तपास सुरू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com